TRENDING:

IPL 2025 : सुनिल नरेनचा आळशीपणा जगाने पाहिला, Live सामन्यात रिंकू सिंग भडकला, Video

Last Updated:

आयपीएल 2025 मध्ये गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. ईडन गार्डनच्या घरच्या मैदानात झालेल्या सामन्यात केकेआरचा गुजरात टायटन्सने 39 रननी धुव्वा उडवला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोलकाता : आयपीएल 2025 मध्ये गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. ईडन गार्डनच्या घरच्या मैदानात झालेल्या सामन्यात केकेआरचा गुजरात टायटन्सने 39 रननी धुव्वा उडवला आहे. गुजरातने दिलेल्या 199 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून फक्त 159 रनच करता आले. या सामन्यात केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला.
सुनिल नरेनचा आळशीपणा जगाने पाहिला, Live सामन्यात रिंकू सिंग भडकला, Video
सुनिल नरेनचा आळशीपणा जगाने पाहिला, Live सामन्यात रिंकू सिंग भडकला, Video
advertisement

बॅटिंगला आलेल्या गुजरातच्या दोन्ही ओपनरनी चांगली सुरूवात केली. शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांच्यात 12.2 ओव्हरमध्ये 114 रनची पार्टनरशीप झाली. शुबमन गिलने 55 बॉलमध्ये 90 रन तर साई सुदर्शनने 36 बॉलमध्ये 52 रनची खेळी केली. याशिवाय जॉस बटलरने 23 बॉलमध्ये नाबाद 41 रन केले. केकेआरकडून वैभव अरोरा, हर्षीत राणा आणि आंद्रे रसेलला एक-एक विकेट मिळाली.

advertisement

केकेआर आणि गुजरात यांच्यातल्या या सामन्यात रिंकू सिंग आणि सुनिल नरेन या कोलकात्याच्या दोन्ही खेळाडूंमध्ये लाईव्ह मॅचमध्ये पंगा झाला. केकेआरची बॉलिंग सुरू असताना 10 व्या ओव्हरमध्ये रिंकू सिंग सुनिल नरेनवर ओरडला. सुनिल नरेनने फिल्डिंग करत असताना आळशीपणा दाखवल्यामुळे रिंगू सिंग त्याच्यावर संतापला.

advertisement

10व्या ओव्हरचा चौथा बॉल सुनिल नरेनने शुबमन गिलला टाकला, यानंतर नरेन बॉलच्या मागे धावला, पण तो अचानक थांबला. अखेर रिंकू सिंग बाऊंड्री लाईनवरून आला आणि त्याने बॉल नॉन स्ट्रायकर एण्डच्या दिशेने फेकला. सुनिल नरेनच्या या आळशीपणाबद्दल रिंकू सिंगने कॅमेरासमोरच नाराजी व्यक्त केली, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

advertisement

गुजरात प्ले-ऑफच्या जवळ

केकेआरविरुद्धच्या विजयासह गुजरात प्ले-ऑफच्या आणखी जवळ पोहोचली आहे. गुजरातने या मोसमात आतापर्यंत 8 पैकी 6 मॅच जिंकल्या आहेत, तर फक्त 2 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. 12 पॉईंट्ससह गुजरात पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी गुजरातला आता उरलेल्या 6 सामन्यांपैकी फक्त दोन सामने जिंकावे लागणार आहेत. तर केकेआरसाठी प्ले-ऑफचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. केकेआरला प्ले-ऑफला पोहोचायचं असेल तर त्यांना त्यांच्या उरलेल्या 6 मॅचपैकी 5 मॅच जिंकाव्या लागणार आहेत.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : सुनिल नरेनचा आळशीपणा जगाने पाहिला, Live सामन्यात रिंकू सिंग भडकला, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल