TRENDING:

IPL 2025 : ना विराट, ना रोहित... कुणालाच जमलं नाही ते केएल राहुलने करून दाखवलं, आयपीएलमध्ये इतिहास घडला!

Last Updated:

केएल राहुलने आयपीएलमध्ये शतक ठोकून नवा इतिहास रचला आहे. रविवारी गुजरात टायटन्सविरुद्ध राहुलने नाबाद 112 रनची खेळी केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : केएल राहुलने आयपीएलमध्ये शतक ठोकून नवा इतिहास रचला आहे. रविवारी गुजरात टायटन्सविरुद्ध राहुलने नाबाद 112 रनची खेळी केली. यासह, केएल राहुल आयपीएलच्या इतिहासात तीन वेगवेगळ्या टीमसाठी शतकं करणारा पहिला खेळाडू बनला आहे. रविवारी दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुलने शतक झळकावले. त्याने याआधी पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपरजायंट्ससाठीही शतके झळकावली आहेत.
ना विराट, ना रोहित... कुणालाच जमलं नाही ते केएल राहुलने करून दाखवलं, आयपीएलमध्ये इतिहास घडला!
ना विराट, ना रोहित... कुणालाच जमलं नाही ते केएल राहुलने करून दाखवलं, आयपीएलमध्ये इतिहास घडला!
advertisement

रविवारी आयपीएल 2025 मध्ये दोन सामने होते. पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सचा 10 रननी पराभव केला. यानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना खेळवण्यात आला. पहिले बॅटिंग करताना दिल्ली कॅपिटल्सने 3 विकेटच्या मोबदल्यात 199 रन केल्या. यापैकी 112 रन एकट्या केएल राहुलने केल्या.

या सामन्यात केएल राहुल ओपनिंग करण्यासाठी आला आणि शेवटपर्यंत तो आऊट झाला नाही. यादरम्यान त्याने 65 बॉलमध्ये 112 रनची नाबाद खेळी केली. केएल राहुलचे आयपीएलमधील हे पाचवे शतक आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याऱ्या खेळाडूंमध्ये केएल राहुल चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. विराट कोहलीने आयपीएलमध्ये सर्वाधिक 8 शतके केली आहेत. क्रिस गेल 7 शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि जॉस बटलर 6 शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

advertisement

केएल राहुलने 60 बॉलमध्ये आपले शतक पूर्ण केले. आयपीएल 2025 मध्ये उजव्या हाताच्या बॅटरने झळकावलेले हे पहिले शतक आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात याआधी चार डावखुऱ्या बॅटरनी शतके झळकावली आहेत. यामध्ये इशान किशन, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्या यांचा समावेश आहे.

केएल राहुलची ही खेळी खूपच संथ होती. त्याने 172.30 च्या स्ट्राईक रेटने 65 बॉलमध्ये 112 रन केल्या. केएलने त्याच्या डावात 14 फोर आणि 4 सिक्स मारले. केएल राहुलने 35 बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने शतक पूर्ण करण्यासाठी आणखी 25 बॉल खेळले.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : ना विराट, ना रोहित... कुणालाच जमलं नाही ते केएल राहुलने करून दाखवलं, आयपीएलमध्ये इतिहास घडला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल