आयपीएलचा १८वा हंगाम सुरू होण्याआधी स्पर्धेशी संबंधीत काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या.
IPL 2025: कधी आणि कुठे होणार पहिला सामना?
स्पर्धेची सुरुवात: 22 मार्च 2025
पहिला सामना: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
सामन्याचे ठिकाण: ईडन गार्डन्स स्टेडियम, कोलकाता
कुठे आणि कसा पाहू शकता IPL 2025 लाईव्ह?
क्रिकेट चाहते IPL 2025 चे थेट प्रक्षेपण अनेक प्लॅटफॉर्म्सवर पाहता येणार आहे.
advertisement
टीव्ही ब्रॉडकास्ट: स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सर्व सामने थेट प्रक्षेपित केले जातील.
ऑनलाइन स्ट्रीमिंग: जिओहॉटस्टार (JioHotstar) अॅप आणि वेबसाइटवर IPL चे थेट प्रक्षेपण पाहता येईल.
IPL 2025 लाईव्ह स्ट्रीमिंग मोफत असेल का?
मागील दोन IPL हंगाम (2023 आणि 2024) जिओ सिनेमावर मोफत स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होते. मात्र या वर्षी (IPL 2025) लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी जिओहॉटस्टारचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.
आयपीएलमध्ये एकूण 10 संघ असून यावेळी कोण विजेता होणार याची उत्सुकता लागली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांच्या नावावर सर्वाधिक 5 विजेतेपद आहेत. तर कोलकात नाईट रायडर्सने 3 वेळा जेतेपद मिळवले आहे.