हैदराबादने शमीशिवाय ऑलराऊंडर नितीशकुमार रेड्डी आणि कामिंदू मेंडिस यांनाही टीमबाहेर केलं. या तिघांऐवजी सचिन बेबी, अभिनव मनोहर आणि एहसान मलिंगा यांना संधी देण्यात आली आहे. सचिन बेबी आणि अभिनव मनोहर अनकॅप भारतीय खेढालू आहेत, तर मलिंगा श्रीलंकेचा फास्ट बॉलर आहे. ऑस्ट्रेलियाचा ओपनर ट्रॅव्हिस हेड याला इम्पॅक्ट सब म्हणून वापरण्यात येणार आहे.
advertisement
शमी टीमबाहेर
या सामन्याआधी मोहम्मद शमीला मेलवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मोहम्मद शमीची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी निराशाजनक झाली आहे. आतापर्यंतच्या 9 सामन्यांमध्ये शमीला फक्त 6 विकेट घेता आल्या, तर 4 सामन्यांमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही, त्यामुळे हैदराबादच्या टीम मॅनेजमेंटने शमीला टीमबाहेर करण्याचा निर्णय घेतला.
हैदराबादची प्लेयिंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, ईशान किशन, सचिन बेबी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स, हर्षल पटेल, झीशान अन्सारी, ईशान मलिंगा, जयदेव उनाडकट
दिल्ली कॅपिटल्सची प्लेयिंग इलेव्हन
अभिषेक पोरेल, फाफ डुप्लेसिस, करुण नयार, केएल राहुल, अक्षर पटेल, ट्रिस्टन स्टब्स, विप्रज नीगम, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, टी. नटराजन