मुंबई सध्या पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे. मुंबईचे 13 सामन्यात गुण 16 सर्वांत कमी आहे. मुंबईने जर त्यांचा शेवटचा सामना जिंकला तर त्याचे गुण 18 होणार आहेत. मात्र तरी देखील मुंबईचा टॉप 2 मध्ये पोहोचता येणार नाही आहे.कारण गुजरात 18 गुणांनी आधीच टेबल टॉपला आहे.त्यानंतर पंजाब किंग्ज आणि बंगळुरूचे 17 गुण होते. त्यामुळे मुंबईसाठी टॉप 2 अशक्यच आहे.
advertisement
बंगळुरूला दोन्ही सामने हरले पाहिजेत...
पण तरी जर पाहायला गेलं तर बंगळुरूला काल हैदराबादने पराभूत केलं होतं. त्यामुळे बंगळुरूचे 17 गुण राहिले.आता त्यांचा पुढचा सामना लखनऊसोबत आहे. ही तिच लखनऊ आहे जिने बलाढ्य गुजरात टायटन्सचा दोनच दिवसापुर्वी पराभव केला होता. आता लखनऊने पुन्हा एकदा अशीच कामगिरी केली तर बंगळुरूचा मोठा गेम होईल आणि ती चौथ्या स्थानावर ढकलली जाईल.
पंजाब किंग्ज संध्या 17 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. आणि पंजाबचे दोन सामने उरले आहे. एक दिल्ली विरूद्ध आणि एक मुंबई विरूद्ध आहे. पंजाबसमोर ही दोन्ही मोठी आव्हान आहेत.त्यामुळे पंजाब जर हे दोन्ही सामने हारली तर ती तिसऱ्या स्थानी फेकली जाईल.
त्यामुळे बंगळुरू आणि पंजाबने दोन्ही हारल्याचा थेट फायदा मुंबईला होईल आणि मुंबई टॉप 2मध्ये पोहोचेल. गुजरात बद्दल बोलायचं झालं तर त्यांचे सध्या 18 गुण आहेत. त्यांचा पुढचा सामना चेन्नईशी आहे.चेन्नईचा सध्याचा फॉर्म पाहता गुजरात त्यांना हरवून 20 गुण मिळवून टेबल टॉपला कायम राहिल.
मुंबईचा क्वालिफायर सामना कुणासोबत?
जर गुजरातने चेन्नईचा पराभव करत 20 गुण मिळवले तर शुभमन गिलची टीम टॉपला जाईल. अशाप्रकारे एक नंबरवर असलेल्या गुजरात टायटन्स आणि दोन नंबरवर असलेल्या मुंबई इंडियन्समध्ये पहिला क्वालिफायर सामना पार पडेल.या सामन्यात जिंकणारा संघाला थेट फायनलचं तिकीट मिळेल.