TRENDING:

Mumbai Indians : मुंबईचा गेम ओव्हर होताच भडकला कोच जयवर्धने, 2 खेळाडूंवर फोडलं खापर!

Last Updated:

आयपीएल 2025 च्या क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्जविरुद्ध पराभव पत्करावा लागला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी खूपच खराब बॉलिंग आणि फिल्डिंग केली, ज्यामुळे मुंबईचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदाबाद : आयपीएल 2025 च्या क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्जविरुद्ध पराभव पत्करावा लागला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी खूपच खराब बॉलिंग आणि फिल्डिंग केली, ज्यामुळे मुंबईचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. मुंबईने दिलेल्या 204 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबचे दोन महत्त्वाचे कॅच मुंबईच्या फिल्डरनी सोडले. या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि ट्रेन्ट बोल्ट यांनी नेहल वधेराचा कॅच सोडला होता. नेहल वधेराने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि 48 धावांची मौल्यवान खेळी केली. सामन्यानंतर, मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी त्यांच्या टीममधील खेळाडूंना फटकारले.
मुंबईचा गेम ओव्हर होताच भडकला कोच जयवर्धने, 2 खेळाडूंवर फोडलं खापर!
मुंबईचा गेम ओव्हर होताच भडकला कोच जयवर्धने, 2 खेळाडूंवर फोडलं खापर!
advertisement

जयवर्धने कुणावर रागावला?

मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने सामन्यानंतर म्हणाले, 'आम्ही त्या दोन कॅचमध्ये काही चुका केल्या पण खेळ असाच आहे. गेल्या सामन्यात नशिबाने आम्हाला साथ दिली होती, पण या सामन्यात काहीही चांगले झाले नाही'.

क्वालिफायर-2 मध्ये पंजाब किंग्जचा विजय

या सामन्यात पंजाब किंग्जच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करत चाहत्यांची मने जिंकली. पण मुंबई इंडियन्सचे खेळाडू या सामन्यात आपली छाप सोडू शकले नाहीत. मुंबई इंडियन्सने आपल्या बॅटिंगचे कौशल्य दाखवत 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 203 रन केल्या. या आव्हानाचा पाठलाग पंजाब किंग्जने अवघ्या 19 ओव्हरमध्ये करून सामना जिंकला. पंजाबकडून कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद 87 रनची स्फोटक खेळी केली आणि आपल्या टीमला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

advertisement

श्रेयस अय्यरने मुंबई इंडियन्सच्या एकाही बॉलरला सोडले नाही आणि सर्वांवर जोरदार हल्ला केला. आता आयपीएल 2025 चा अंतिम सामना 3 जून रोजी खेळवला जाणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि आरसीबी यांच्यात हा अंतिम सामना खेळला जाईल. दरम्यान मुंबई इंडियन्स त्यांच्या कामगिरीवर खूप नाराज असतील. मुंबईने जर चांगली फिल्डिंग केली असती, तर कदाचित फायनलमध्ये मुंबईचा सामना आरसीबीविरुद्ध झाला असता.

advertisement

इतिहास घडवण्यासाठी दोन्ही टीम तयार

आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांनी अद्याप एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही, त्यामुळे आयपीएलला यंदाच्या मोसमात एक नवा चॅम्पियन मिळणार आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : मुंबईचा गेम ओव्हर होताच भडकला कोच जयवर्धने, 2 खेळाडूंवर फोडलं खापर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल