पॉईंटस टेबलवर नजर टाकल्यास गुजरात टायटन्स 13 सामन्यात 18 गुणांसह पहिल्या स्थानी आहे. गुजरात एकच सामना उरला आहे, जो चेन्नई विरूद्ध उद्या रविवारी रंगणार आहे. हा सामना जिंकून गुजरात टायटन्स 20 गुणांसह टेबल टॉपला पोहोचणार आहे.
आता गुजरात जर टॉपला पोहोचली आहे. तर दुसऱ्या स्थानासाठी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलँजेर्स बंगळूरू प्रयत्न करतील. सध्या पंजाब आणि बंगळूरूचे 17 गुण आहेत. पण यातल्या पंजाबलाच दुसऱ्या स्थानी पोहोचण्याची संधी आहे. कारण हैदराबादने शुक्रवारी बंगळुरूचा पराभव केला होता.त्यामुळे बंगळुरुकडे आता एकच सामना उरला आहे. हा सामना जिंकुन त्यांना जास्तीत जास्त 19 गुणांपर्यंत पोहोचता येणार आहे.
advertisement
आता या दोन्ही संघापैकी एकही संघ टॉप 2 ला गेला तर टेबल टॉप आणि दुसऱ्या नंबरवर असलेल्या टीममध्ये क्वालिफायर 1 सामना पार पडेल. हा सामना जिंकणार संघ फायनलमध्ये पोहोचेल.तर पराभूत होणाऱ्या संघाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. पराभूत संघाला एलिमिनेटरमध्ये विजय मिळवणाऱ्या संघासोबत लढाव लागणार आहे.त्यानंतर जिंकणारा संघ दुसरा फायनलिस्ट ठरेल.
संध्या मुंबई चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे मुंबई त्यांचा शेवटचा सामना जिंकून 18 व्या गुणांपर्यंत मजल मारू शकतो.त्यामुळे मुंबई तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानापर्यंत येऊ शकतो. त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या संघामध्ये जर इलिमिनेटर सामना झाला तर मुंबई विरूद्ध त्या संघाला पराभूत व्हाव लागेल. ही भिती अनेक संघाना आहे, त्यामुळे इतर संघ टॉप 2 मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.