कशी झाली राकेशची फसवणूक?
चिक्कोडी तालुक्यातील चिंचणी गावातील रहिवासी राकेश यदुरे हा राज्यस्तरीय क्रिकेटपटू आहे. मे 2024 मध्ये हैदराबाद येथे झालेल्या स्पर्धेत राकेशने प्रभावी कामगिरी केली, त्यानंतर राकेशला व्यावसायिक क्रिकेटमध्ये मोठी संधी मिळण्याची अपेक्षा होती. डिसेंबर 2024 मध्ये, राकेशला इंस्टाग्रामवर एक मेसेज आला, ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सच्या टीममध्ये निवड झाल्याचं त्याला सांगितलं गेलं. यानंतर राकेशला एक फॉर्म भरून 2 हजार रुपये जमा करायला सांगण्यात आले.
advertisement
हा मेसेज खरा मानून राकेशने फॉर्म भरला आणि पैसे जमा केले. यानंतर फसवणूक करणारे राकेशच्या संपर्कात आले आणि प्रत्येक सामन्यासाठी 40 हजार ते 8 लाख रुपयांपर्यंत फीचं आश्वासन दिलं. 22 डिसेंबर 2024 ते 19 एप्रिल 2025 पर्यंत, राकेशने अनेक वेळा ऑनलाइन पेमेंटद्वारे एकूण 23,53,550 रुपये ट्रान्सफर केले. जेव्हा फसवणूक करणाऱ्यांनी अतिरिक्त 3 लाख रुपये मागितले आणि कोणतेही किट, जर्सी किंवा तिकिटे पाठवली नाहीत, तेव्हा राकेशला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. नंतर सायबर गुन्हेगारांनी राकेशला सर्व प्लॅटफॉर्मवर ब्लॉक केले.
राकेशचे वडील कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळात सुरक्षा रक्षक आहेत, त्यांनी त्यांच्या मुलाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुमारे 24 लाख रुपयांची व्यवस्था केली होती. ही रक्कम उभारण्यासाठी कुटुंबाला गंभीर आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले. 'फसवणूक करणाऱ्यांनी पैसे जमा केल्यानंतर लगेचच काढून घेतले आणि आता त्यांची खाती रिकामी आहेत. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की फसवणूक करणारे राजस्थानमधून काम करत होते आणि तेथे सायबर क्राईम टीम पाठवली जाईल', असं बेळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुलेद म्हणाले आहेत.