TRENDING:

IPL 2025 : मुंबईला 24 तासात दुसरी गूड न्यूज... अजिंक्य रहाणेने रोहितला दिलं बर्थडे गिफ्ट

Last Updated:

आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सचा धमाका सुरूच आहे. मागच्या 24 तासांमध्ये एकही मॅच न खेळता मुंबईला दोन गुड न्यूज मिळाल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सचा धमाका सुरूच आहे. मागच्या 24 तासांमध्ये एकही मॅच न खेळता मुंबईला दोन गुड न्यूज मिळाल्या आहेत. सोमवारी राजस्थानविरुद्धच्या सामन्यात गुजरातचा दारूण पराभव झाल्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर फेकलं गेलं, तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली. आता मंगळवारी केकेआरने दिल्लीला पराभवाचा धक्का दिल्याने मुंबईचा दुसरा क्रमांक आणखी मजबूत झाला आहे.
मुंबईला 24 तासात दुसरी गूड न्यूज... अजिंक्य रहाणेने रोहितला दिलं बर्थडे गिफ्ट
मुंबईला 24 तासात दुसरी गूड न्यूज... अजिंक्य रहाणेने रोहितला दिलं बर्थडे गिफ्ट
advertisement

केकेआरविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा विजय झाला असता तर दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आणि मुंबई पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली असती. एवढंच नाही तर या सामन्यात दिल्लीला मोठा विजय मिळाला असता तर त्यांना आरसीबीला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर जायचीही संधी होती, पण अजिंक्य रहाणेच्या केकेआरने रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला वाढदिवसाचं गिफ्ट दिलं आहे. बुधवार 30 एप्रिलला रोहति शर्माचा वाढदिवस आहे.

advertisement

पॉईंट्स टेबलची स्थिती

सध्याच्या पॉईंट्स टेबलनुसार आरसीबी 10 सामन्यांमध्ये 7 विजय आणि 3 पराभवांसह पहिल्या क्रमांकावर आहे. आरसीबीच्या खात्यात 14 पॉईंट्स आहेत. तर मुंबई, गुजरात आणि दिल्लीच्या खात्यात प्रत्येकी 12-12 पॉईंट्स आहेत. पण मुंबई आणि दिल्लीचे 10-10 सामने झाले आहेत तर गुजरातने 9 मॅच खेळल्या आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर पंजाब, सहाव्या क्रमांकावर लखनऊ, सातव्या क्रमांकावर केकेआर, आठव्या क्रमांकावर राजस्थान, नवव्या क्रमांकावर हैदराबाद आणि दहाव्या क्रमांकावर चेन्नई आहे.

advertisement

पंजाबने 9 सामन्यांमध्ये 5 विजय आणि 3 पराभवांसह 11 पॉईंट्स कमावले आहेत. पंजाबचा एक सामना पावसामुळे रद्द झाला. तर लखनऊने 10 पैकी 5, केकेआरने 10 पैकी 4, राजस्थानने 10 पैकी 3, हैदराबादने 9 पैकी 3 आणि चेन्नईने 9 पैकी 2 सामने जिंकले आहेत.

पंजाबला दुसऱ्या क्रमांकाची संधी

आयपीएल 2025 मध्ये बुधवारी पंजाबचा सामना चेन्नईविरुद्ध होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून पंजाबला पाचव्या क्रमांकावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर जायची संधी आहे. पंजाबने चेन्नईचा पराभव केला तर त्यांचे 10 सामन्यांमध्ये 6 विजयांसह 13 पॉईंट्स होतील. पंजाब आणि चेन्नई यांचातला सामना बुधवारी संध्याकाळी 7.30 वाजता धर्मशालामध्ये खेळवला जाणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : मुंबईला 24 तासात दुसरी गूड न्यूज... अजिंक्य रहाणेने रोहितला दिलं बर्थडे गिफ्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल