हर्षा भोगले यांचा पंच
वैभवचं यश केवळ त्याच्या वयामुळे नाही, तर मैदानावर त्याने दाखवलेल्या वादळी आणि निर्भय दृष्टिकोनामुळे मिळालं. प्रत्येक सामन्यात त्यानं स्फोटक फलंदाजी करण्यावर भर दिला. त्याच्या आक्रमकतेचा कळस म्हणजे त्याने अवघ्या 35 चेंडूंमध्ये झळकावलेले तडाखेबंद शतक... या हंगामात त्याचा स्ट्राइक रेट इतर अनुभवी फलंदाजांपेक्षाही अधिक होता, ज्यामुळे तो या पुरस्काराचा एकमुखी मानकरी ठरला. मात्र, वैभवच्या वयामुळे त्याच्याकडे गाडी चालवण्याचं लायसन्स नसेल. अजून चार वर्ष त्याला गाडी घरी पडून ठेवावी लागेल. हर्षा भोगले यांनी याच मुद्द्यावरून पंच मारला होता.
advertisement
गाडी ड्राईव्ह करता येणार नाही
'सुपर स्ट्रायकर' बनल्याबद्दल वैभवला बक्षीस म्हणून टाटा कर्व्ह (Tata Curvv) ही अत्याधुनिक इलेक्ट्रिक कार मिळाली. ही कार तिच्या अद्भुत वैशिष्ट्यांमुळे आणि तंत्रज्ञानामुळे ओळखली जाते. आपल्या पहिल्याच व्यावसायिक क्रिकेट हंगामात इतकं मोठं बक्षीस जिंकून वैभवने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. परंतू वैभवला ही गाडी चालवता येणार नाही. वैभवचं वय कमी असल्याने त्याला गाडी ड्राईव्ह करता येणार नाही. वैभवने जर अनधिकृरित्या गाडी चालवली तर त्याच्या आई-वडिलांना जेलमध्ये देखील जावं लागू शकतं.
दरम्यान, भारतात या टाटा कर्व्हची एक्स-शोरूम किंमत १७ लाख ४९ हजार रुपयांपासून सुरू होते आणि मॉडेलनुसार ती वाढत जाते. मिळालेल्या माहितीनुसार, वैभवला मिळालेल्या टॉप मॉडेलची किंमत सुमारे २२ लाख रुपये असण्याची शक्यता आहे. एका युवा खेळाडूने आपल्या प्रतिभेच्या जोरावर इतकी मौल्यवान गाडी जिंकणे, हे खरंच प्रेरणादायी आहे.