राजस्थान रॉयल्स मोठा बदल करणार
राजस्थान रॉयल्स 2026 च्या आयपीएलआधी त्यांची टीम पूर्णपणे बदलू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार राजस्थान रॉयल्सना त्यांच्या टीममधील 6 खेळाडूंना ट्रेड करण्याची ऑफर आयपीएलच्या वेगवेगळ्या फ्रँचायझींकडून मिळाली आहे. आयपीएल टीमसाठी ट्रेडिंग विंडो 2025 च्या फायनलच्या एक दिवसानंतर म्हणजेच 4 जून रोजी सुरू झाली आणि 2026 च्या लिलावाच्या तारखेच्या एक आठवडा आधीपर्यंत खुली राहील. खेळाडूंचा लिलाव संपल्यानंतर, विंडो पुन्हा उघडेल आणि पुढील हंगाम सुरू होण्याच्या अगदी एक महिना आधी बंद होईल.
advertisement
राजस्थान कुणाला सोडणार?
राजस्थान कोणत्या खेळाडूंची देवाणघेवाण करण्याची योजना आखत आहे हे अद्याप उघड झालेले नाही. पण ज्या खेळाडूंना ट्रेड-ऑफसाठी जास्त मागणी असेल त्यापैकी एक म्हणजे त्यांचा कर्णधार संजू सॅमसन. असे मानले जाते की सीएसके संजूला त्यांच्या टीममध्ये सामील करू इच्छित आहे. खरंतर, सीएसकेला एका विकेटकीपर बॅटरची आवश्यकता आहे, कारण एमएम धोनी लवकरच 45 वर्षांचा होणार आहे. त्याच वेळी, केकेआरही संजूला त्यांच्या टीममध्ये घेण्यासाठी इच्छुक आहे.
राजस्थान रॉयल्सच्या जवळच्या सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, 'अनेक फ्रँचायझींनी आमच्या जवळजवळ सहा खेळाडूंसाठी आमच्याशी अनेक वेळा संपर्क साधला आहे. त्याचप्रमाणे, आम्ही अनेक पर्यायांसाठी अनेक फ्रँचायझींशी संपर्क साधला आहे. ट्रेडमध्ये मुख्य गोष्ट अशी आहे की प्रत्येक जण त्यांच्या टीमला बळकट करणाऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी तयार असतात, आम्हीही तसाच विचार करतो. असे अनेक मालक आहेत जे नियमितपणे ट्रेडवर एकमेकांशी संपर्क साधतात.'