TRENDING:

Mumbai Indians : मुंबई इंडियन्स या 5 खेळाडूंना करणार रिलीज, IPL 2026 साठी पत्ता कट!

Last Updated:

मुंबई इंडियन्सने त्यांची शेवटची आयपीएल ट्रॉफी 2020 साली जिंकली होती, मागच्या 5 वर्षात एकही ट्रॉफी न मिळाल्यामुळे आता मुंबई इंडियन्स 2026 च्या आयपीएल आधी काही खेळाडूंना टीममधून बाहेर करू शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सचं आव्हान क्वालिफायर-2 मध्येच संपुष्टात आलं. मुंबई इंडियन्सने त्यांची शेवटची आयपीएल ट्रॉफी 2020 साली जिंकली होती, मागच्या 5 वर्षात एकही ट्रॉफी न मिळाल्यामुळे आता मुंबई इंडियन्स 2026 च्या आयपीएल आधी काही खेळाडूंना टीममधून बाहेर करू शकते, या खेळाडूंना आयपीएल 2025 मध्ये जास्त खेळायची संधी मिळाली नाही, त्यामुळे मुंबई या खेळाडूंना रिलीज करण्याची शक्यता आहे.
मुंबई इंडियन्स या 5 खेळाडूंना करणार रिलीज, IPL 2026 साठी पत्ता कट!
मुंबई इंडियन्स या 5 खेळाडूंना करणार रिलीज, IPL 2026 साठी पत्ता कट!
advertisement

मुजीब उर रहमानला डच्चू

आयपीएल लिलावामध्ये मुंबईने अफगाणिस्तानचा स्पिनर अल्लाह गजनफरला विकत घेतलं होतं, पण गजनफरला दुखापत झाल्यामुळे अफगाणिस्तानचाच मिस्ट्री स्पिनर मुजीब उर रहमानला संधी देण्यात आली होती. आयपीएलच्या या मोसमात मुजीब उर रहमानला एकच मॅच खेळण्याची संधी मिळाली. टीम कॉम्बिनेशनमध्ये मुजीब उर रहमान फिट बसत नसल्यामुळे मुंबई मुजीबला टीममधून बाहेर करू शकते.

advertisement

सत्यनारायण राजूचाही पत्ता कट

सत्यनारायण राजू यालाही आयपीएल 2025 मध्ये फक्त 2 मॅच खेळण्याची संधी मिळाली, पण तो टीममध्ये अश्विनी कुमार आणि कॉर्बिन बॉशसारखे बॉलर असल्यामुळे मागे राहिला. सत्यनारायण राजूला दोन मॅच खेळायची संधी मिळाली पण यामध्ये त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही.

राज अंगद बावाही बेंचवर

राज अंगद बावा हा ऑलराऊंडर आहे, या मोसमात मुंबईने त्याला दोन सामन्यांमध्ये खेळवलं पण दोन्ही वेळा त्याला बॅटिंग आणि बॉलिंग मिळाली नाही. गुजरातविरुद्धच्या एलिमिनेटर आणि पंजाब किंग्सविरुद्धच्या क्वालिफायर-2 मध्ये राज अंगद बावा प्लेयिंग इलेव्हनमध्ये होता.

advertisement

टॉपलीने केली निराशा

रीस टॉपलीला यंदाच्या मोसमात फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. पंजाबविरुद्धच्या क्वालिफायर-2 मध्ये टॉपली मैदानात उतरला, पण श्रेयस अय्यरने त्याला लागोपाठ 3 बॉलला 3 सिक्स मारल्या आणि सामना तिथेच फिरला. रीस टॉपलीलाही मुंबई रिलीज करण्याची शक्यता आहे.

श्रीजीत कृष्णन

श्रीजीत कृष्णन हा विकेट कीपर बॅटर आहे. मुंबईच्या टीममध्ये आधीच रियान रिकलटन आणि रॉबिन मिन्झ हे दोन विकेट कीपर आहेत, त्यामुळे श्रीजीत कृष्णनला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स या 5 खेळाडूंना करणार रिलीज, IPL 2026 साठी पत्ता कट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल