आयपीएलच्या गेल्या हंगामापर्यंत 500 रुपयांच्या मूळ किमतीच्या आयपीएल तिकिटाची किंमत 28 टक्के जीएसटीसह 640 रुपये होती. पण, 2026 च्या हंगामात सरकारने 40 टक्के जीएसटी लादल्यानंतर, आता त्याच तिकिटाची किंमत 700 रुपये असेल. कारण आयपीएल तिकिटांना लक्झरी वस्तूंच्या श्रेणीत वर्गीकृत करण्यात आले आहे.
टीम इंडियाला सूट
पण भारताच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वर्गीकरण इतर क्रीडा स्पर्धांमध्ये करण्यात आले आहे, त्यामुळे 500 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या तिकिटांवर 18 टक्के जीएसटी लागेल. 500 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या कोणत्याही तिकिटावर जीएसटी लावला जाणार नाही. अशा परिस्थितीत, भारतीय क्रिकेट टीमच्या सामन्यात चाहत्यांना निश्चितच दिलासा मिळेल, पण आयपीएलसाठी मात्र त्यांना जास्त पैसे मोजावे लागतील.
advertisement
'मान्यताप्राप्त क्रीडा स्पर्धांसह इतर क्रीडा स्पर्धांमध्ये प्रवेशावर सवलत सुरू राहील जिथे तिकिटाची किंमत 500 रुपयांपेक्षा जास्त नसेल. आणि जर तिकिटाची किंमत 500 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्यावर 18 टक्के मानक दराने कर आकारला जाईल', असं नियमांमध्ये म्हटलं आहे. आयपीएलचा विचार केला तर बीसीसीआयचे तिकिटांच्या किमतींवर कोणतेही नियंत्रण नाही. आयपीएल तिकीटाच्या किंमती प्रत्येक फ्रँचायझी त्यांच्या संबंधित घरच्या मैदानावर ठरवते.
