काय म्हटला होता इरफाण पठाण?
व्हायरल झालेल्या व्हिडीओ इरफाण म्हणतोय की, धोनी हुक्का ओढायचा आणि त्याच्यासोबत हुक्का ओढणाऱ्या खेळाडूंना तो पाठिंबा देत असे. मला कुणासाठी हुक्का सेच तयार करण्याची सवय नव्हती, असं इरफाण म्हणाला. पठाणच्या या दाव्याची खिल्ली उडवण्यात आली आणि त्यावरून बराच गोंधळ उडाला होता. त्यानंतर त्याला यावर स्पष्टीकरण देखील द्यावं लागलं.
advertisement
हुक्क्याचं काय झालं?
माझ्या विधानाच्या विकृत संदर्भासह अर्धा दशक जुना व्हिडिओ आता समोर येत आहे. हे फॅन वॉर आहे? की पीआर लॉबी? असा सवाल इरफाण पठाणने विचारलाय. तर हुक्क्याचं काय झालं? असा प्रश्न एका सोशल मिडिया युझरने विचारला तेव्हा इरफाणने उत्तर दिलं. मी आणि एमएस धोनी सोबत बसून हुक्का घेणार, असं इरफाण पठाण म्हणाला.
महेंद्रसिंग धोनीसोबत छान मैत्री
भारतीय क्रिकेट संघात तुमचे कोण मित्र आहेत? असा सवाल देखील इरफाणला विचारला गेला होता. त्यावेळी त्याने तीन नावं घेतली. रॉबिन उथप्पा, सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनी... हे तिन्ही खेळाडू माझ्याशिवाय जेवत नव्हते आणि मी त्यांच्याशिवाय जेवत नाही. जेव्हा आम्ही एकत्र खेळायचो तेव्हा आमची खूप छान मैत्री होती, असं इरफाण सांगतो.
इरफान पठाणची कारकीर्द
दरम्यान, पठाणने २९ कसोटी सामन्यांमध्ये ३१.५७ च्या सरासरीने ११०५ धावा केल्या, ज्यामध्ये एक शतक आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने ३२.२६ च्या सरासरीने १०० विकेट्स घेतल्या. त्याने सात वेळा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आणि दोनदा सामन्यात १० विकेट्स घेतल्या.