Ishan Kishan Mother Reaction on Selection : आगामी टी20 वर्ल्ड कप 2026 साठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे.या संघातून शुभमन गिल आणि जितेश शर्मा बाहेर झाले आहेत. तर ईशान किशनची सरप्राईज एंन्ट्री झाली आहे. विशेष म्हणजे मागच्या दोन वर्षापासून ईशान किशन टीम इंडियाच्या बाहेर होता. त्याची टी20 वर्ल्ड कपसाठी निवड होईल की नाही? याची कुणालाच अपेक्षा नव्हती. पण अखेर त्याची निवड झाली आहे. ईशानच्या या निवडीनंतर त्याची आई माध्यमांसमोर भावूक झाली होती.
advertisement
न्यूज 18 लोकमतने ईशान किशनची वर्ल्डकप संघात निवड झाल्यानंतर त्याच्याशी आणि त्याच्या कुटुंबियाशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे.यावेळी माध्यमांशी बोलताना ईशान किशनच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले होते. ईशानची संघात निवड झाल्याने खुप आनंद झाला आहे, तुम्हाला सांगू शकत नाही इतका मला आनंद झाला आहे. या गोष्टीची वाट आम्ही मागच्या 2 वर्षापासून करत होतो,असे ईशान किशनच्या आईने सांगितले.
दोन वर्ष माझ्या मुलाने खूप मेहनत केली. त्याचेच फळ त्याला मिळाल्याचे त्याची आई सांगते.त्यामुळे खुप आनंद होत आहे,असे ईशानच्या आईने सांगितले. जेव्हा टीम इंडिया जाहीर होणार होती त्यावेळेस मी पुजा करत होते.त्याचवेळी निवड झाली आणि देवासमोरच माझ्या डोळ्यात अश्रू आले. खूप मेहनत केली त्याने आणि त्याला ती गोष्ट मिळाली, असे ईशानची आई सांगते.
ईशानने खूप मेहनत केली आहे आणि हिंमतीने लढला. तो वर्ष बाहेरचा होता याच दु:ख होतं पण ते दु:ख त्याने त्याच्या चेहऱ्यावर आम्हाला कधीच जाणवू दिलं नाही. तुम्हाला त्याच्याशी बोलून कधीच कळणार नाही,त्याच्या मनात चाललंय तरी नेमकं काय,अशी एक बाजू देखील इशानच्या आईने सांगितली.
झारखंड संघाला त्याने विजय मिळवून दिला. हा खूप मोठा विजय होता. आणि सगळ्यांनी तो मोठ्या उत्साहाने साजरा केला. त्यामुळे त्याचं मनोबल आणखी वाढलं,असे देखील ईशानच्या आईने सांगितलं.
टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रिंकु सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरून चक्रवती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन.
