ध्रुव जुरैलचा भन्नाट कॅच
जो रूट आऊट झाला अन् दुसरीकडे दुखापतीमुळे बेन स्टोक्सला मैदान सोडावं लागल्याने दोन्ही नवे खेळाडू मैदानात आले. त्यामुळे टीम इंडियासमोर एक संधी निर्माण झाली. शुभमनने थोडीही चूक न करता आपला स्टार बॉलर बुमराहला बॉलिंगला जुंपलं. बुमराहने जेमी स्मिथ याला माघारी धाडण्याचं काम चोखपणे बजावलं. ध्रुव जुरैल याने एक भन्नाट कॅच पकडला. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
advertisement
पाहा Video
दरम्यान, काही नेटकऱ्यांनी ध्रुवच्या कॅचवर आक्षेप घेतलाय. तर काहींनी ध्रुवच्या कॅचचं कौतूक केलंय. त्यामुळे व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा. जेमी स्मिथ आऊट की नॉट आऊट..!
टीम इंडियासमोर नवी अवदसा! ड्रेसिंग रुममध्ये जाताना स्टार प्लेयरचा मुरगळला पाय, Video समोर
चौथ्या टेस्टसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन - यशस्वी जयस्वाल, के एल राहुल, साई सुदर्शन, कर्णधार शुभमन गिल, उपकर्णधार रिषभ पंत, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज.
चौथ्या टेस्टसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन - जॅक क्राऊली, बेन डकेट,ओली पोप,जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार),जेमी स्मिख, क्रिस वोक्स, लियाम डॉसन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर.