IPL 2025 मध्ये खेळण्यासाठी...
बुमराहच्या फिटनेसवर अद्याप अनिश्चितता कायम आहे. जर तो कोणत्याही वेदना किंवा अडथळ्याशिवाय गोलंदाजी करू शकला, तरच त्याला IPL मध्ये खेळण्याची परवानगी मिळेल. तज्ज्ञांच्या मते त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी किमान एक आठवडा लागणार आहे.
IPLचा पहिला सामना कोणत्या संघात झाला? IPLच्या ‘पहिल्या’ रेकॉर्ड्सची यादी!
advertisement
मुंबई इंडियन्सच्या रणनीतीवर परिणाम?
मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी अलीकडेच पत्रकार परिषदेत सांगितले की, बुमराहने पुनर्वसन प्रक्रियेला सुरुवात केली आहे. आम्हाला त्याच्या प्रगतीची वाट पाहावी लागेल. सध्या सर्व काही योग्य दिशेने जात आहे, पण हा दिवसागणिक होणारा निर्णय आहे. तो सकारात्मक मूडमध्ये आहे. मात्र संघासाठी त्याचा गैरहजेरी मोठी अडचणीची ठरू शकते.
IPL 2025 मोफत पाहता येणार का? Live Streaming बाबत सर्व काही जाणून घ्या
मुंबई इंडियन्सचा पहिला सामना CSK विरुद्ध
मुंबई इंडियन्स IPL 2025ची सुरुवात 23 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध चेपॉकच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर करणार आहे. संघाकडे ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर, इंग्लंडचा रीस टॉपली आणि दक्षिण आफ्रिकेचा कोर्बिन बॉश यांसारखे वेगवान गोलंदाज उपलब्ध आहेत. याशिवाय कर्णधार हार्दिक पांड्या आणि अर्जुन तेंडुलकर यांसारखे खेळाडूही गोलंदाजीत योगदान देऊ शकतात. बुमराह IPL 2025 मध्ये खेळणार का? यावर अद्याप सस्पेन्स कायम असून त्याच्या फिटनेसवर संपूर्ण हंगामाचा प्रभाव पडू शकतो.