IPLचा पहिला सामना कोणत्या संघात झाला होता? पहिला चेंडू, पहिला चौकार, पहिला षटकार, पहिला प्लेयर ऑफ द मॅच; ‘पहिल्या’ रेकॉर्ड्सची यादी!

Last Updated:

IPL List Of First Records: आयपीएलच्या 18व्या हंगामातील पहिली लढत KKR vs RCB यांच्यात होत आहे. विशेष म्हणजे 2008 साली याच दोन संघात आयपीएलच्या इतिहासातील पहिली मॅच झाली होती.

News18
News18
मुंबई: आयपीएलच्या 18व्या हंगामाची सुरुवात 22 मार्चपासून होणार आहे. हंगामातील पहिला सामना कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये रंगणार आहे. विशेष म्हणजे याच दोन संघांमध्ये 2008 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या आयपीएल सामन्यातदेखील टक्कर झाली होती. 17 वर्षांपूर्वी खेळल्या गेलेल्या पहिल्या आयपीएल सामन्यातील ‘पहिल्या’ ऐतिहासिक घटनांवर एक नजर टाकूया.
1. पहिला चेंडू
आयपीएलच्या पहिल्या सामन्यात राहुल द्रविडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार याने IPLच्या इतिहासातील पहिला चेंडू टाकला होता. हा पहिली चेंडू केकेआरचा कर्णधार सौरव गांगुलीने खेळला होता. हा चेंडू स्टम्प्सवर पडून इनस्विंग झाला, ज्यामुळे गांगुलीला फटका मारता आला नाही. चेंडू त्याच्या मांडीला लागून स्क्वेअर लेगकडे गेला आणि ब्रेंडन मॅक्क्युलमने धाव घेत पहिली रन पूर्ण केली.
advertisement
2. पहिला चौकार:
प्रवीण कुमारने पहिल्या षटकात फक्त तीन धावा दिल्यानंतर झहीर खानला दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी आणले. पहिल्या चेंडूवर मॅक्क्युलम शॉट मारण्यात चुकला. मात्र दुसऱ्या चेंडूवर त्याने मिडविकेटच्या दिशेने शानदार फटका मारत आयपीएलच्या इतिहासातील पहिला चौकार मारला.
advertisement
3. पहिला षटकार:
याच षटकातील चौथ्या चेंडूवर मॅक्क्युलमने आयपीएलमधील पहिला षटकार ठोकला. झहीर खानच्या 125.8 किमी प्रतितास वेगाने आलेल्या चेंडूवर त्याने ऑफ साइडला थोडेसे सरकून फटका मारला. चेंडू त्याच्या बॅटच्या बाहेरच्या बाजूला लागून थर्डमॅनच्या वरून सीमारेषेबाहेर गेला.
4. पहिली विकेट:
पहिल्या पाच षटकांतच केकेआरने 60 धावा केल्या होत्या. सहाव्या षटकात झहीर खानला परत गोलंदाजीसाठी आणण्यात आले आणि दुसऱ्या चेंडूवर सौरव गांगुलीला बाद केले. झहीरने टाकलेल्या आऊटस्विंग चेंडूवर गांगुलीने ऑनसाइडला फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडूचा आणि बॅटचा स्पर्श झाला आणि स्लिपमध्ये उभ्या असलेल्या जॅक कॅलिसच्या हातात गेला.
advertisement
5. पहिले अर्धशतक:
ब्रेंडन मॅक्क्युलमने केवळ 32 चेंडूत अर्धशतक झळकावत आयपीएलमधील पहिले अर्धशतक आपल्या नावावर केले. नवव्या षटकात जॅक कॅलिसच्या चेंडूवर त्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने दोन धावा घेत स्पर्धेच्या इतिहासातील पहिले अर्धशतक पूर्ण केले.
6. पहिला शतक:
अर्धशतक पूर्ण केल्यानंतर मॅक्क्युलमने आक्रमक खेळ करत अवघ्या 53 चेंडूत शतक झळकावले. 16व्या षटकात अ‍ॅश्ले नॉफकेच्या चेंडूवर दोन धावा घेत त्याने आयपीएलमधील पहिले शतक झळकावले.
advertisement
7. पहिली मॅच विजेता संघ:
केकेआरने 20 षटकांत 222/3 धावा केल्या. यात मॅक्क्युलमने केवळ 73 चेंडूत 158 धावा ठोकल्या होत्या. हा सामना आरसीबीसाठी वाईट ठरला. त्यांचा संपूर्ण संघ केवळ 82 धावांत बाद झाला. केकेआरच्या अजित आगरकरने 25 चेंडूत 3 विकेट घेत प्रभावी कामगिरी केली. तर अशोक डिंडा आणि सौरव गांगुलीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. केकेआरने 140 धावांनी मोठा विजय मिळवला.
advertisement
8. पहिला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार:
ब्रेंडन मॅक्क्युलमला त्याच्या जबरदस्त खेळीबद्दल पहिल्या आयपीएल सामन्यात ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 13 षटकार मारले होते.
आयपीएलच्या इतिहासातील पहिला सामना आजही क्रिकेटप्रेमींच्या आठवणीत ताजा आहे. केकेआरने मिळवलेला विजय, मॅक्क्युलमची धडाकेबाज खेळी आणि झहीर खानच्या पहिल्या विकेटने आयपीएलला एक शानदार सुरुवात मिळाली. आता 2025 मध्ये या दोन संघांमध्ये पुन्हा पहिला सामना होत आहे. आता या लढतीत काय होते याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPLचा पहिला सामना कोणत्या संघात झाला होता? पहिला चेंडू, पहिला चौकार, पहिला षटकार, पहिला प्लेयर ऑफ द मॅच; ‘पहिल्या’ रेकॉर्ड्सची यादी!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement