MI Team Preview IPL 2025: सहाव्या जेतेपदासाठी मुंबई इंडियन्सकडे ‘ट्रंप कार्ड’; मात्र हंगामाच्या आधीच वाजली धोक्याची घंटा
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Mumbai Indians Team Preview IPL 2025: पाच वेळा आयपीएल विजेतेपद जिंकलेल्या मुंबई इंडियन्ससाठी 2025 हंगाम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या 4 वर्षांपासून ट्रॉफीपासून दूर असलेल्या या संघावर यंदा जबरदस्त दडपण असणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली MI संघ नव्या रणनीतीसह मैदानात उतरणार असून सहाव्या विजेतेपदाची जोरदार तयारी सुरू आहे.
पाच वेळा आयपीएल विजेतेपद जिंकलेल्या मुंबई इंडियन्स संघाने 2025 हंगामात सहाव्या विजेतेपदासाठी आपली तयारी सुरू केली आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबईने गेल्या पाच वर्षांत विजेतेपद जिंकलेले नाही.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स
भारतीय स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या यंदाही मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांना अनुक्रमे 16.30 कोटी, 16.35 कोटी, 18 कोटी आणि 8 कोटी रुपयांना कायम ठेवण्यात आले.
मेगा लिलावातील नव्या खेळाडूंची भर
मुंबई इंडियन्सने जेद्दामध्ये झालेल्या दोन दिवसांच्या मेगा लिलावात काही महत्त्वाचे खेळाडू संघात घेतले. इंग्लंडचा अष्टपैलू विल जॅक्स, दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक-फलंदाज रायन रिकेल्टन, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि फिरकीपटू मिचेल सॅंटनर यांना संघात सामील करण्यात आले आहे.
advertisement
दोन खेळाडू बाहेर
मुंबई इंडियन्सने लिलावात घेतलेले दोन परदेशी खेळाडू - अल्लाह गजानफर आणि लिझाड विल्यम्स - हंगाम सुरू होण्याआधीच स्पर्धेबाहेर झाले आहेत. त्यांच्या जागी अफगाणिस्तानचा मुझीब उर रहमान आणि दक्षिण आफ्रिकेचा कोर्बिन बॉश यांना संघात घेतले आहे.
advertisement
बुमराहवर प्रश्नचिन्ह
जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीबाबत शंका कायम आहे. काही रिपोर्टनुसार, बुमराह हंगामाच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. मात्र, तो नंतरच्या सामन्यांसाठी उपलब्ध असू शकतो.
पहिला सामना CSKविरुद्ध
मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 23 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होणार आहे. त्यानंतर त्यांचा दुसरा सामना हार्दिक पंड्याच्या माजी संघ गुजरात जायंट्सविरुद्ध होईल. मुंबईचा पहिला होम मॅच 31 मार्चला गतविजेते कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध खेळवला जाईल.
advertisement
2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रदर्शन
मुंबई इंडियन्सने 2024 हंगामात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली केवळ 14 पैकी 4 सामने जिंकले. संघाला 8 गुणांसह गुणतालिकेत शेवटच्या (10व्या) स्थानावर समाधान मानावे लागले.
IPL 2025 साठी मुंबई इंडियन्सचे सर्वोत्तम प्लेइंग XI
रोहित शर्मा,रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक),तिलक वर्मा,सूर्यकुमार यादव,हार्दिक पंड्या (कर्णधार),नमन धीर,मिचेल सॅंटनर, दीपक चाहर,मुझीब उर रहमान,ट्रेंट बोल्ट,जसप्रीत बुमराह.
advertisement
मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ (IPL 2025)
हार्दिक पंड्या (C), सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिन्झ, कर्ण शर्मा, रायन रिकेल्टन, दीपक चाहर, मुझीब उर रहमान, विल जॅक्स, अश्वनी कुमार, मिचेल सॅंटनर, रीस टॉपली, कृष्णन श्रीजीत, राज बावा, सत्यनारायण राजू, बेवन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर, कोर्बिन बॉश, विग्नेश पुथूर.
advertisement
मुंबई इंडियन्सकडून 2025 मध्ये अपेक्षा
गेल्या मोसमातील निराशाजनक कामगिरीनंतर मुंबई इंडियन्स यंदा पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्यासारख्या अनुभवी खेळाडूंसह, संघ युवा खेळाडूंना संधी देत नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 16, 2025 7:17 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MI Team Preview IPL 2025: सहाव्या जेतेपदासाठी मुंबई इंडियन्सकडे ‘ट्रंप कार्ड’; मात्र हंगामाच्या आधीच वाजली धोक्याची घंटा