IPL 2025 CSK Team Preview: IPLच्या सहाव्या जेतेपदासाठी CSK मास्टरप्लान, ऋतुराजच्या नेतृत्वाची खरी परीक्षा; ‘येलो आर्मी’चा सुपरस्टार कोण?

Last Updated:

IPL 2025 CSK Team Preview: गेल्या वर्षीच्या निराशाजनक अपयशानंतर चेन्नई सुपर किंग्स यंदा नव्या जोमाने पुनरागमन करण्यास तयार आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली, अनुभवी खेळाडूंच्या उपस्थितीत आणि घरच्या मैदानावर उत्कृष्ट रणनीतीसह CSK पुन्हा एकदा आयपीएलचे विजेतेपद पटकावू शकतो.

News18
News18
चेन्नई सुपर किंग्ज (CSK)हा इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या इतिहासातील संयुक्तपणे सर्वात यशस्वी संघ आहे. आता IPL 2025 मध्ये चेन्नईचा संघ विक्रमी सहाव्या विजेतेपदासाठी मैदानावर उतरेल. मागील हंगामात चेन्नई लीग स्टेजमधून बाहेर पडला होता. आता नव्या हंगामात ‘यल्लो आर्मी’ पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या तयारी आहे.
नेतृत्वात बदल आणि नवीन रणनीती
मागील हंगामात महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) अचानकपणे कर्णधारपदाची जबाबदारी ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांच्याकडे सोपवली. या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र, आता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संघ अधिक स्थिर आणि आत्मविश्वासपूर्ण दिसत आहे. चेन्नईने रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि सॅम करन (Sam Curran) यांसारख्या खेळाडूंना पुन्हा संघात घेऊन आपल्या ‘घरच्या’ खेळाडूंना प्राधान्य दिले आहे.
advertisement
धोनीचा अनुभव 
धोनीने राष्ट्रीय संघासाठी पाच वर्षांहून अधिक काळ न खेळल्यामुळे, त्यांना ‘अनकॅप्ड’ खेळाडू म्हणून संघात कायम ठेवता आले आहे. धोनीचा अनुभव आणि युवा खेळाडू यामुळे CSK एक मजबूत संघ बनला आहे. संघात रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), रचिन रवींद्र (Rachin Ravindra), नूर अहमद (Noor Ahmad) आणि अश्विन यांसारख्या फिरकी गोलंदाजांचा समावेश असल्याने, चेन्नईच्या घरच्या मैदानावर फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांचा पुरेपूर फायदा घेण्याचा संघाचा प्लॅन दिसतोय.
advertisement
IPL 2024 मधील कामगिरी
मागील हंगामात CSK प्लेऑफच्या उंबरठ्यावरून बाहेर पडला होता. संघाने 14 पैकी 7 सामने जिंकले आणि 7 सामने गमावले. मात्र, गुणतालिकेत अवघ्या काही गुणांनी संघ अंतिम चारमध्ये स्थान मिळवू शकला नाही. 2025 मध्ये हे अपयश मागे टाकून संघ पुन्हा विजेतेपदावर कब्जा करण्यास उत्सुक आहे.
CSK चा संभाव्य मजबूत प्लेइंग XI
ऋतुराज गायकवाड (कर्णधार),डेव्हॉन कॉनवे,रचिन रवींद्र,शिवम दुबे,रवींद्र जडेजा,महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक),रवीचंद्रन अश्विन,खलील अहमद,नूर अहमद,मथीशा पाथिराना,मुकेश चौधरी,
advertisement
CSK चा संपूर्ण संघ
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), मथीशा पाथिराना, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), डेव्हॉन कॉनवे, राहुल त्रिपाठी, रचिन रवींद्र, रवीचंद्रन अश्विन, खलील अहमद, नूर अहमद, विजय शंकर, सॅम करन, शेख रशीद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, दीपक हुडा, गुरजापनीत सिंग, नॅथन एलिस, जेमी ओव्हरटन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, श्रेयस गोपाल, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ.
advertisement
चेन्नई सुपर किंग्जचे संपूर्ण वेळापत्रक (दुपारच्या लढती सोडून अन्य सर्व सामने संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होतील)
23 मार्च: CSK वि. MI, चेन्नई
28 मार्च: CSK वि. RCB, चेन्नई
30 मार्च: CSK वि. RR, गुवाहाटी
5 एप्रिल: CSK वि. DC, चेन्नई (दुपारी 3:30 वाजता)
8 एप्रिल: CSK वि. PBKS, न्यू चंदीगड
advertisement
11 एप्रिल: CSK वि. KKR, चेन्नई
14 एप्रिल: CSK वि. LSG, लखनौ
20 एप्रिल: CSK वि. MI, मुंबई
25 एप्रिल: CSK वि. SRH, चेन्नई
30 एप्रिल: CSK वि. PBKS, चेन्नई
3 मे: CSK वि. RCB, बंगळुरू
7 मे: CSK वि. KKR, कोलकाता
12 मे: CSK वि. RR, चेन्नई
18 मे: CSK वि. GT, अहमदाबाद (दुपारी 3:30 वाजता)
advertisement
चेन्नई सुपर किंग्जचा संघ IPL 2025 मध्ये दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. धोनीच्या अनुभवाचा आणि युवा खेळाडूंच्या आक्रमकतेच्या मेळ घालून संघ सहाव्या विजेतेपदावर आपले नाव कोरण्यासाठी प्रयत्नशील असेल. धोनीचा हा अखेरचा हंगाम असण्याची शक्यता असल्याने संघ त्याला जेतेपदासह निरोप देईल का हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 CSK Team Preview: IPLच्या सहाव्या जेतेपदासाठी CSK मास्टरप्लान, ऋतुराजच्या नेतृत्वाची खरी परीक्षा; ‘येलो आर्मी’चा सुपरस्टार कोण?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement