ड्रेसिंग रुममध्ये जाताना काय घडलं?
जसप्रीत बुमराहने इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 50 बळी पूर्ण केले आहेत. उजव्या हाताच्या या वेगवान गोलंदाजाने ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी हा टप्पा गाठला. पण हाच जसप्रीत बुमराह ड्रेसिंग रुममध्ये (Jasprit bumrah suffered injury) जाताना जखमी झाल्याचं पहायला मिळतंय. जसप्रीत बुमराह नवीन चेंडूने फक्त 1 ओव्हर टाकल्यानंतर मैदानाबाहेर गेला. बुमराहच्या बाहेर पडण्यामुळे त्यालाही दुखापत झाली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला होता. अशातच पायऱ्यावरून जाताना बुमराहला दुखापत झाल्याचं समोर आलंय.
advertisement
जसप्रीत बुमराहचा पाय मुरगळला
जसप्रीत बुमराह पायऱ्यावरून जात असताना त्याचा पाय देखील मुरगळला. त्यावेळी दुसऱ्या एका सहकाऱ्याने त्याला आधार दिला आणि ड्रेसिंग रुममध्ये नेलं. त्यावेळी बॉलिंग कोच मोर्ने मॉर्कल आणि टी दुलीप यांनी बुमराहला आधार दिला. त्याचा व्हिडीओ एका प्रेक्षकाच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पाहा Video
टीम इंडियाचा स्टार बॉलर बुमराह मैदानाबाहेर पडणं ही टीम इंडियासाठी चांगली बातमी नाही. जसप्रीत बुमराह जेव्हा नवीन चेंडू घेऊन गोलंदाजी करायला आला तेव्हा त्याने त्या ओव्हरमध्ये त्याने 11 धावा दिल्या. त्यात 1 नो बॉलही होता. त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक झाला आणि तो मैदानाबाहेर गेला.