खेळाडू पर्याय निवडू शकत नाहीत
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय असा नियम आणण्याचा विचार करत आहे की, खेळाडू त्यांच्या इच्छेनुसार मालिका किंवा सामना खेळण्याचा पर्याय निवडू शकत नाहीत. संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती आणि व्यवस्थापनाचे अनेक उच्च अधिकारी यावर सहमत आहेत की खेळाडूंना त्यांच्या मनाप्रमाणे करण्यापासून रोखले पाहिजे. या संदर्भात, खेळाडूंना असं न करण्याची ताकीद देण्यात यावी असंही म्हटलं आहे.
advertisement
वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका खेळणार की नाही?
आम्ही अत्यंत स्पर्धात्मक आणि रोमांचक कसोटी मालिकेतील उत्तम आठवणी परत आणतो. पुढे काय होईल याची उत्सुकता आहे, असं जसप्रीत बुमराह म्हणाला आहे. त्यामुळे आता बुमराह आगामी वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका खेळणार की नाही? असा सवाल विचारला जात आहे. "जसप्रीत बुमराह येत्या काळात कसोटी क्रिकेटला निरोप देईल कारण त्याचे शरीर त्याला साथ देत नाही. मला वाटतं की तुम्ही त्याला आगामी कसोटी सामन्यांमध्ये खेळताना पाहू शकणार नाही आणि तो निवृत्तही होऊ शकतो", असं मोहम्मद कैफ म्हणाला होता.
बुमराहचं टेस्ट करिअर
दरम्यान, जसप्रीत बुमराहने 2018 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सुरुवातीला मर्यादित ओव्हर्सच्या मॅचमध्येच यशस्वी होणारा बॉलर म्हणून त्याची ओळख होती, परंतु त्याने कसोटीमध्येही स्वतःला सिद्ध केलं. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी मॅचेसमध्ये 200 विकेट्स घेणाऱ्या भारतीय बॉलर्सपैकी तो एक आहे. तसेच, परदेशी खेळपट्ट्यांवर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय बॉलर्समध्येही त्याचे नाव आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध हॅट्ट्रिकही घेतली होती. बुमराहने आतापर्यंत 48 कसोटी मॅचेसमध्ये 219 विकेट्स घेतल्या आहेत. यात 15 वेळा एका डावात 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम त्याने केला आहे. त्याची सरासरी (average) सुमारे 19.82 आहे, जी कोणत्याही बॉलरसाठी खूप चांगली मानली जाते.