ब्रायन लाराला मागे टाकले
श्रीलंकेविरुद्ध 111 रन केल्यानंतर, जो रूटने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 506 इनिंगमध्ये 22,413 रन केल्या आहेत. त्याने ब्रायन लाराला मागे टाकले आहे, लाराने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 22,358 रन केल्या होत्या. रूटने त्याच्या शानदार कारकिर्दीत 61 शतके आणि 116 अर्धशतके केली आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये फक्त सचिन तेंडुलकर, विराट कोहली, कुमार संगकारा, रिकी पॉन्टिंग, महेला जयवर्धने, जॅक कॅलिस आणि राहुल द्रविड हे रूटच्या पुढे आहेत.
advertisement
34,357 रन - सचिन तेंडुलकर
28,215 रन - विराट कोहली
28,016 रन - कुमार संगकारा
27,483 रन - रिकी पॉन्टिंग
25,957 रन - महेला जयवर्धने
25,534 रन - जॅक कॅलिस
24,208 रन - राहुल द्रविड
22,413 रन - जो रूट
विराट कोहलीपेक्षा रूट खूप मागे
जो रूटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22 हजार पेक्षा जास्त रन केल्या आहेत, पण तो या यादीत विराट कोहलीपेक्षा खूप मागे आहे. विराटने टी-20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि आता तो फक्त वनडे सामने खेळतो. विराटने 626 इनिंगमध्ये 28,215 रन केल्या आहेत. रूटने 61 शतके केली आहेत, तर विराटने तिन्ही फॉरमॅटमध्ये 85 शतके केली आहेत. विराटने फक्त वनडे क्रिकेटमध्येच 54 शतके झळकावली आहेत, जी जगात सर्वाधिक आहेत.
