आर्चरला जागा दाखवली
मोठं धाडस दाखवत ऋषभ पंत फ्रॅक्चर असताना देखील मैदानात उतरला. टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात येईल, असं दिसत असताना ऋषभ लंगडत का होईना मैदानात आला अन् 27 बॉल फेस केले. यावेळी इंग्लंडच्या खेळाडूंनी निर्दयीपणे त्याच्या फ्रॅक्चर पायावर बॉलने मारा केला. इंग्लंडचा स्टार बॉलर जोफ्रा आर्चर याने ऋषभच्या पायावर एक यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला पण ऋषभने यशस्वीपणे बॉल खेळला. पण पुढच्याच बॉलवर ऋषभने आर्चरला जागा दाखवली.
advertisement
आर्चरला खणखणीत सिक्स
आर्चरने जेव्हा पुढचा बॉल टाकला तेव्हा ऋषभने गॅप काढला अन् आर्चरला खणखणीत सिक्स मारला. आडव्या पट्टीत घेऊन आर्चरला सिक्स मारल्याने प्रेक्षकांनी एकच कल्ला केला. ऋषभ पंतने 75 बॉलमध्ये 54 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 3 फोर आणि 2 सिक्स मारले.
पाहा Video
वोक्सचा बॉल लागल्यानंतर पंतला तातडीने स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे त्याच्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी त्याला किमान सिक्स आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे, ज्यामुळे तो या मालिकेतील पुढील मॅच खेळू शकणार नाही हे स्पष्ट झाले आहे.