केएल राहुलचं कमबॅक
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, केएल राहुलला बांगलादेशविरुद्धच्या टी-20 टीममध्ये स्थान मिळू शकते. राहुलने नोव्हेंबर 2022 नंतर भारतासाठी एकही टी-20 सामना खेळलेला नाही. टी-20 क्रिकेटमधल्या स्ट्राइक रेटमुळे केएल राहुलवर मोठ्या प्रमाणात टीका होते, पण आयपीएल 2025 मध्ये राहुलने त्याच्या टीकाकारांची बोलती बंद केली आहे.
आयपीएल 2025 मध्ये केएल राहुलने आतापर्यंत 11 सामन्यांमध्ये 61.63 च्या सरासरीने 493 रन केल्या आहेत. या हंगामात त्याच्या बॅटमधून एक शतक आणि 3 अर्धशतकेही आली आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुलने आयपीएल 2025 मध्ये 148 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आहे. केएल राहुलच्या या कामगिरीमुळे निवड समितीही प्रभावित झाली आहे.
advertisement
1021 दिवसानंतर राहुलचं कमबॅक
केएल राहुलने भारताकडून शेवटचा टी-20 सामना 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध राहुल 5 रन करून आऊट झाला होता. राहुलचं बांगलादेशविरुद्धच्या टी-20 सामन्यात पुनरागमन झालं तर तो 1,021 दिवसानंतर भारताकडून टी-20 खेळेल. केएल राहुलने आतापर्यंत 72 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2 शतकं आणि 22 अर्धशतकांच्या मदतीने 2,265 रन केल्या आहेत.