भारतीय क्रिकेट टीम आता थेट पुढच्या वर्षीच मैदानात उतरणार आहे. जानेवारी महिन्यात न्यूझीलंडची टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याची सुरूवात 3 वनडे मॅचच्या सीरिजने होईल. त्यानंतर दोन्ही टीममध्ये 5 टी-20 मॅचची सीरिज होईल. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपआधीची भारताची ही शेवटची सीरिज असेल. 2026 चा टी-20 वर्ल्ड कप 7 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे, तर न्यूझीलंडविरुद्धची टी-20 सीरिज 31 जानेवारीला संपणार आहे.
advertisement
आधी वनडे सीरिज
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरूवातीला वनडे सीरिज खेळवली जाईल. तीन सामन्यांची ही सीरिज 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे. सीरिजचा शेवटचा सामना 18 जानेवारीला खेळवला जाईल. वनडे सीरिजनंतर दोन्ही टीममध्ये टी-20 सीरिज होईल. टी-20 सीरिजला 21 जानेवारीला सुरूवात होईल.
भारत-न्यूझीलंड वनडे सीरिज
11 जानेवारी - पहिला वनडे : बडोदा (दुपारी 1:30)
14 जानेवारी - दुसरी वनडे : राजकोट (दुपारी 1:30)
18 जानेवारी - तिसरा वनडे : इंदूर (दुपारी 1:30)
भारत-न्यूझीलंड टी-20 सीरिज
21 जानेवारी - पहिला T20: नागपूर (संध्याकाळी 7)
23 जानेवारी - दुसरी T20: रायपूर (संध्याकाळी 7)
25 जानेवारी - तिसरा T20: गुवाहाटी (संध्याकाळी 7)
28 जानेवारी - चौथी T20 : विशाखापट्टणम (संध्याकाळी 7)
31 जानेवारी - पाचवी T20: तिरुवनंतपुरम (संध्याकाळी 7)
