TRENDING:

MI vs CSK सामन्यात ऋतुराजची चिटिंग? खलील अहमदवर Ball tampering चा आरोप, मॅचमधील Video व्हायरल

Last Updated:

MI vs CSK Ball Tampering : चेन्नईचा स्टार गोलंदाज खलील अहमद ऋतुराज गायकवाडला गुपचूप काहीतरी देतो आणि ऋतुराजने ते त्याच्या खिशात ठेवतो, असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
CSK Accused Of Ball Tampering Vs MI : आयपीएल 2025 च्या तिसऱ्या सामन्यात नेहमीप्रमाणेच मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात जोरदार लढत झाली. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना विशेष काही कमाल दाखवली नाही. चेन्नईच्या खलील अहमदने 3 आणि नूर अहमदने 4 गडी बाद करत मुंबईला 155 धावांवर रोखले. चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांनी 67 धावांची भागीदारी करून चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली. रचिनने दमदार अर्धशतक ठोकलं आणि चेन्नईला विजय मिळवून दिला. मात्र, या सामन्यातील एका व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.
CSK Accused Of Ball Tampering Vs MI
CSK Accused Of Ball Tampering Vs MI
advertisement

चेन्नईवर Ball Tampering चा आरोप

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चेन्नईचा स्टार गोलंदाज खलील अहमद त्याच्या खिशातून काहीतरी काढताना दिसत आहे. इतक्यात कॅप्टन ऋतुराज गायकवाड येतो, दोघंही काहीतरी बोलतात. फिल्डिंगची स्ट्रॅटर्जी सुरू असताना खलील बॉल ऋतुराजकडे सोपवतो. मग निघताना, खालिद अहमद शांतपणे कॅप्टनला काहीतरी देतो, जे तो त्याच्या खिशात ठेवतो. त्यानंतर बॉल ऋतुराजने खलीलकडे दिला.

advertisement

पाहा Video

बॉल टॅम्परिंग म्हणजे काय?

क्रिकेटमध्ये बॉल टॅम्परिंग म्हणजे जेव्हा एखादा खेळाडू अनधिकृत पद्धतीने बॉलसोबत छेडछाड करतो. हे मुख्यतः चेंडू स्विंग होण्यास मदत करण्यासाठी केलं जाते. सॅडपेपर किंवा तत्सम वस्तू वापर करुन या गोष्टी केल्या जातात. बॉल टॅम्परिंगमुळे खेळात असमतोल निर्माण होतो, कारण एका बाजूला चेंडू अधिक स्विंग होतो, ज्यामुळे गोलंदाजाला फायदा मिळतो.

advertisement

सामना कसा झाला?

कॅप्टन ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांच्या अर्धशतकांमुळे चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला चार विकेट्सने हरवून आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दमदार सुरूवात केली आहे. सामन्यात मुंबईने टॉस गमावून प्रथम फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये नऊ गडी गमावून 155 धावा केल्या. प्रत्युत्तरात, सीएसकेने 19.1 ओव्हरमध्ये सहा गडी गमावून 158 धावा केल्या आणि सामना जिंकला.

advertisement

मुंबई इंडियन्स (Playing XI): रोहित शर्मा, रायन रिकल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, रॉबिन मिन्झ, मिशेल सॅंटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू.

चेन्नई सुपर किंग्ज (Playing XI): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, दीपक हुडा, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, सॅम कुरन, एमएस धोनी (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, नॅथन एलिस, खलील अहमद.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MI vs CSK सामन्यात ऋतुराजची चिटिंग? खलील अहमदवर Ball tampering चा आरोप, मॅचमधील Video व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल