श्रेयसचे चार खणखणीत सिक्स
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 203 धावांचा डोंगर उभारला. मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्जने 19 व्या ओव्हरमध्ये मॅच संपवली. पंजाब किंग्जला 12 बॉलमध्ये 23 धावांची गरज होती. सामना अखेरच्या ओव्हरमध्ये जाईल, अशी शक्यता होती. पण श्रेयस अय्यरने 19 व्या ओव्हरमध्ये आश्विनी कुमार याला आडव्या पट्टीत घेतलं. श्रेयसने चार खणखणीत सिक्स मारले अन् मॅच फिरवली. त्यामुळे 19 वी ओव्हर आश्विनीला देण्याचा निर्णय चुकला का? असा सवाल विचारला जात आहे.
advertisement
हार्दिक पांड्याकडे दोन पर्याय
हार्दिक पांड्याकडे दोन पर्याय शिल्लक होते. जसप्रीत बुमराहच्या चारही ओव्हर आधीच संपवल्याची घोडचूक हार्दिकने केली. हार्दिक पांड्या स्वत: ओव्हर टाकू शकत होता. तर रीस टोपली याला देखील ओव्हर देता आली असती. कोणत्याही सामन्यात 19 वी ओव्हर महत्त्वाची असते. अशातच हार्दिक पांड्या युवा आश्विनी कुमारकडे का गेला? असा सवाल विचारला जात आहे. अश्विनीला श्रेयसने चार सिक्स मारून सामन्यातून मुंबईला बाहेर पाठवलं होतं.
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (विकेटकिपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, अजमातुल्ला ओमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार विषाक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, राज बावा, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रीस टोपली.