हार्दिकचा प्लॅन फेल...
हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सविरुद्ध जी रणनिती तयार केली होती, तिच रणनिती हार्दिकने पंजाबविरुद्ध वापरण्याचा प्रयत्न केला. पण श्रेयस अय्यरने हार्दिक पांड्याचा कट हाणून पाडला. गुजरात टायटन्सविरुद्ध जेव्हा साई सुदर्शन आऊट झाला, तेव्हा हार्दिकने लगेच पारडं फिरवण्यासाठी बुमराहला बॉलिंग दिली. पण पंजाबविरुद्ध हार्दिकचा प्लॅन चालला नाही. हार्दिकने नकळत घोडचूक केली.
advertisement
हार्दिकची घोडचूक
पंजाब किंग्जला विजयासाठी चार ओव्हरमध्ये 41 धावांची गरज होती. त्यावेळी पंजाबचा स्टार प्लेयर श्रेयस अय्यर आणि शशांक सिंग खेळत होते. मात्र, बोल्टच्या 17 व्या ओव्हरमध्ये शशांक सिंग रनआऊट झाल्यानंतर पंजाबवर प्रेशर आलं. त्यावेळी हार्दिकने पुढच्याच ओव्हरमध्ये बुमराहला बॉलिंगला आणलं. पण बुमराहला श्रेयसने आडव्या पट्टीत घेतलं अन् चौथी ओव्हर संपवली. त्यामुळे 19 व्या ओव्हरमध्ये बुमराहसाठी ओव्हर शिल्लक राहिल्या नाहीत.
ऑस्ट्रेलियनकडून बुमराहची धुलाई
दरम्यान, ऑस्ट्रेलियन जॉश इंग्लिशने बुमराहला पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकून काढलं. बुमराहच्या पहिल्या ओव्हरमध्ये इंग्लिशने दोन फोर आणि दोन सिक्स मारले. या ओव्हरमध्ये बुमराहला 20 धावा ठोकल्या. त्यानंतर हार्दिकने बुमराहला थोडा रेस्ट दिला अन् स्पिनर्सला बोलवलं. अखेरीस बुमराहला अखेरच्या ओव्हरसाठी राखून न ठेवणं मुंबई इंडियन्सला भारी पडलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.