अजित आगरकर यांच्या या दाव्यावर मोहम्मद शमीने पलटवार केला. 'निवड समितीने मला कोणतीही अपडेट दिली नाही. मी फिट नसतो तर दुलीप ट्रॉफी आणि बंगालकडून रणजी ट्रॉफी कशी खेळले असतो?' असं शमी म्हणाला. यावर मी खेळाडूंसोबत संपर्कात असतो आणि माझा मोबाईलही नेहमी सुरू असतो, असं प्रत्युत्तर अजित आगरकरने दिलं होतं.
बीसीसीआय ऍक्शन मोडवरmo
advertisement
मोहम्मद शमी आणि निवड समिती प्रमुख यांच्यातला वाद आणखी वाढू नये, यासाठी बीसीसीआय ऍक्शन मोडवर आली आहे. बीसीसीआयने सेंट्रल झोनचे नवनियुक्त निवड समिती सदस्य आरपी सिंग याला कोलकात्यामध्ये पाठवले आहे. इडन गार्डनमध्ये बंगाल आणि गुजरात यांच्यात रणजी ट्रॉफीचा सामना सुरू आहे, या सामन्यादरम्यान आरपी सिंग मोहम्मद शमीसोबत बराच वेळ गप्पा मारताना दिसला. शमीप्रमाणेच आरपी सिंगही उत्तर प्रदेशचा आहे, त्यामुळे दोघांमध्ये चांगला संवाद होऊ शकतो, त्यामुळे शमीची भेट घेण्यासाठी आरपी सिंग आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रणजी मोसमाच्या पहिल्याच सामन्यात मोहम्मद शमीने 7 विकेट घेतल्या, यानंतर त्याने निवड समितीवर निशाणा साधला. अपडेट देणे किंवा मागणे ही माझी जबाबदारी नाही. माझ्या फिटनेसबद्दल अपडेट देणं हे माझं काम नाही. माझं काम एनसीएमध्ये जाणे, तयारी करणे आणि सामने खेळणे आहे, असं मोहम्मद शमी म्हणाला होता, यानंतर अजित आगरकरनेही प्रतिक्रिया दिली. आपलं शमीसोबत मागच्या काही महिन्यात अनेकवेळा बोलणं झालं आहे. मेडिकल टीमला तो अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी फिट नसल्याचं वाटत आहे, असा दावा अजित आगरकरने केला.
