हसीन जहाँचे सनसनाटी आरोप
मोहम्मद शमी स्त्रीलंपट आहे. तो आपल्या गर्लफ्रेंडला प्राधान्य देतो. त्यांना महागडे गिफ्ट देतो. तसेच तो स्वत:च्या मुलीकडे दुर्लक्ष करतो, असा आरोप देखील हसीन जहाँने केला होता. अशातच एका मुलाखतीत मोहम्मद शमीने खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलंय. हसीन जहाँसोबत लग्न केल्याचा पश्चाताप होतो का? असा सवाल विचारला गेला होता. त्यावर मोहम्मद शमी याने उत्तर दिलं.
advertisement
काय म्हणाला मोहम्मद शमी?
मला भुतकाळातील गोष्टींमध्ये रमण्याची इच्छा नाही. त्यामुळे झाल्या गेलेल्या गोष्टी सोडून द्या. जे गेले ते गेले, मी कुणालाही दोष देऊ इच्छित नाही. मला स्वत:ला देखील दोष द्यायचा नाही. मला फक्त माझ्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचंय. मला वादात पडण्याची देखील गरज नाही, असं मोहम्मद शमी म्हणाला आहे.
दरम्यान, शमीची बॉलिंगची खास शैली म्हणजे त्याचा अचूक सीम आणि लाइन... 2023 च्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये शमीने अविश्वसनीय कामगिरी केली. केवळ सात मॅचमध्ये 24 विकेट्स घेऊन तो टूर्नामेंटमधील सर्वात यशस्वी बॉलर ठरला होता. विशेष म्हणजे, न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये त्याने सात विकेट्स घेतल्या, जो एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका भारतीय बॉलरने केलेला सर्वोत्तम विक्रम आहे. या कामगिरीमुळे त्याचं नाव जगभरात प्रसिद्ध झाले.