पुढल्या वर्षी फलंदाजी अधिक मजबूत होईल - धोनी
चेन्नई सुपर किंग्स (CSK) चा खेळाडू महेंद्रसिंग धोनी याने विश्वास व्यक्त केला आहे की, आयपीएलच्या पुढील सीझनमध्ये ऋतुराज गायकवाडच्या पुनरागमनामुळे संघाची फलंदाजी अधिक मजबूत होईल. आम्ही आमच्या बॅटिंग ऑर्डर्सबद्दल थोडे चिंतीत होतो, पण मला वाटते की आता आमची बॅटिंग ऑर्डर खूप व्यवस्थित आहे. ऋतुराज परत येईल. त्याला दुखापत झाली होती. तो परत आल्यानंतर आता आम्ही खूप व्यवस्थित होऊ, असं थाला म्हणाला.
advertisement
आयपीएल 2026 मध्ये सीएसकेचा कॅप्टन कोण?
चेन्नई येथे एका खाजगी कार्यक्रमात 2 ऑगस्ट रोजी बोलताना धोनी म्हणाला की, सीएसकेचा सलामीवीर संघात परत येईल आणि त्याची नेहमीची जबाबदारी स्वीकारेल. त्यामुळे ऋतुराज गायकवाड आगामी आयपीएल 2026 मध्ये सीएसकेची कॅप्टन्सी सांभाळेल, अशी शक्यता आहे.
काय चूक झाली?
होय, मागचे काही वर्ष आमच्यासाठी चांगले नव्हते. आम्ही अपेक्षेप्रमाणे परफॉर्मन्स करू शकलो नाही. पण महत्त्वाचे हे आहे की तुम्ही शिकले पाहिजे. होय, तुमचा सीझन खराब होता. पण काय चूक झाली? आणि हाच प्रश्न मागच्या वर्षीही आमच्यासमोर होता, अशी जाहीर कबुली धोनीने या कार्यक्रमात दिली आहे.
दरम्यान, गेल्या दोन सीझनमध्ये सुपर किंग्सची कामगिरी अपेक्षेपेक्षा खूपच कमकुवत राहिली आहे. संघासाठी त्या कमतरता ओळखणे महत्त्वाचं असल्याचं धोनीने सांगितलं.