धोनीमुळे ऋतुराजची कोंडी?
महेंद्रसिंग धोनी वरच्या क्रमांकावर बॅटिंगला का येत नाही? असा संतप्त सवाल चेन्नईचा चाहते विचारत आहे. तर दुसरीकडे सिनियर म्हणून धोनीला डोक्यावर घेतल्यानंतर ऋतुराज गायकवाड याची कोंडी होतीये का? असा प्रश्न देखील चेन्नईच्या चाहत्यांना भेडसावत आहे. ऋतुराज गायकवाड याला धोनीला कोणत्या ऑर्डरवर पाठवलायचं याचा अधिकार ऋतुराज गायकवाडला नाही का? अशी चर्चा होताना दिसतीये.
advertisement
धोनीवर डोळे झाकून विश्वास
फिल्डिंग करताना डीआरएस घेतल्यानंतर सीएसकेमध्ये धोनीचा निर्णय अंतिम मानला जातो. ऋतुराज धोनीवर डोळे झाकून विश्वास ठेवतोय, याचे परिणाम काल सीएसकेला भोगावे देखील लागले. तर 50 धावांनी पराभव मोठा नाही, असं म्हणत ऋतुराजने धोनीच्या चुकांवर पांघरून टाकण्याचा प्रयत्न केलाय, अशी चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.
अंबाती रायडू म्हणालाच होता...
धोनीची फॅन फॉलोविंग चेन्नईसाठी धोक्याची आहे, असं अंबाती रायडू याने म्हटलं आहे. महेंद्रसिंग धोनीला मिळणारा अभूतपूर्व पाठिंबा हळूहळू एक हानिकारक बनला आहे. जो इतर फलंदाजांसाठी चांगला नाही कारण प्रेक्षक फक्त त्यांची 'थालाची' बॅटिंग पाहू इच्छितात. प्रेक्षकांचा पाठिंबा प्रथम धोनीला आहे आणि नंतर चेन्नई सुपर किंग्जला आहे. यामुळे भविष्यात संघाच्या ब्रँडिंगला हानी पोहोचू शकते कारण संघ नेहमीच एकाच खेळाडूभोवती फिरत राहिलाय, असं अंबाती रायडू म्हणाला आहे.
अखेरच्या ओव्हरमध्ये क्रेडिट
दरम्यान, टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये आपली चमकदार कामगिरी दाखवता यावी, यासाठी मी खालच्या क्रमांकावर खेळतो, असं धोनीने एका मुलाखतीत म्हटलं होतं. मात्र, टी-ट्वेंटीमधून निवृत्त झालेल्या रविंद्र जडेजा आणि आर अश्विन यांना वर पाठवून अखेरच्या ओव्हरमध्ये क्रेडिट घेण्यात काय अर्थ आहे? असा सवाल क्रिडातज्ज्ञ विचारत आहेत.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, सॅम कुरन, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मथीशा पाथीराना, खलील अहमद.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फिलिप सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकिपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल.