महिला प्रीमियर लीग 2026 चं शेड्युल 29 नोव्हेंबरला जाहीर करण्यात आलं होतं. पहिला सामना 9 जानेवारीला गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना आरसीबीविरुद्ध नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. यानंतर 10 जानेवारीला डबल हेडर आहे, ज्यात पहिला सामना यूपी वॉरियर्स आणि गुजरात जाएंट्स यांच्यात आणि दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होईल. या सर्व मॅचची तिकीटं 100 रुपयांपासून सुरू होणारी आहेत.
advertisement
कशी बुक करायची मॅचची तिकीटं?
महिला प्रीमियर लीगच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटो ऍप आणि वेबसाईटवर मॅचची तिकीटं बुक करता येणार आहेत. 1 फेब्रुवारीपर्यंत लीग स्टेजच्या मॅच होणार आहेत.
ऍप किंवा वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिकीट बुकिंगा ऑप्शन येईल, यात तुम्हाला हवी असलेली मॅच सिलेक्ट करा, त्यानंतर स्टेडियममधल्या स्टँडचे फोटो येतील, जिथली तिकीटं उपलब्ध आहेत, यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या पसंतीची जागा निवडू शकता. तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबरवरून लॉग इन करावं लागणार आहे. लॉग इन करताना तुम्हाला एक ओटीपी नंबर येईल, जो तुम्हाला व्हेरिफाय करावा लागेल. यानंतर ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर तुमचं तिकीट बुक होईल.
WPL 2026 च्या टीम
मुंबई इंडियन्स, आरसीबी, युपी वॉरियर्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जाएंट्स
WPL विजेत्या टीम
2023- मुंबई इंडियन्स
2024- आरसीबी
2025- मुंबई इंडियन्स
