एमआय एमिरेट्सने कुसल परेरा, फजलहक फारुकी, मुहम्मद वसीम, रोमारियो शेफर्ड, टॉम बॅन्टन आणि एएम घझनफर यांना रिटेन केलं आहे. तर क्रिस वोक्स आणि कामिंदू मेंडिस यांना मुंबईने टीममध्ये घेतलं आहे. आयएल टी-20 स्पर्धेच्या आयोजकांनी चौथ्या मोसमासाठीच्या पहिल्या टप्प्यातील खेळाडूंची घोषणा केली आहे.
आयएल टी-20 मधील प्रत्येक टीम जास्तीत जास्त 23 खेळाडू टीममध्ये घेऊ शकते. यातले 8 खेळाडू रिटेन किंवा थेट विकत घेतले जाऊ शकतात. आयएल टी-20च्या यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच खेळाडूंचा लिलावही होणार आहे. आयएल टी-20च्या चौथ्या मोसमात एकूण 6 टीम सहभागी होणार आहेत. 34 सामन्यांची ही स्पर्धा 4 डिसेंबर ते 2 जानेवारीदरम्यान खेळवली जाणार आहे.
advertisement
पोलार्ड-पूरन रिलीज
आयएल टी-20च्या मोसमासाठी मुंबईने निकोलस पूरन, कायरन पोलार्ड, आंद्रे फ्लेचर, अकील हुसैन, अल्झारी जोसेफ यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंना रिलीज केलं आहे. निकोलस पूरन तर आयएल टी-20 च्या मागच्या मोसमात एमआय एमिरेट्सचा कर्णधार होता. आयपीएल 2025 च्या या मोसमात निकोलस पूरनने धमाका केला होता. तसंच जगभरात टी-20 लीग खेळण्यासाठी निकोलस पूरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती.