TRENDING:

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचं नशीब चमकलं, इंग्लंड वरून आली गूडन्यूज, 'या' स्पर्धेत खेळणार

Last Updated:

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचं नशीब चमकलं आहे. मुंबईच्या या खेळाडूला टीम इंडियाच्या टेस्ट संघात स्थान मिळालं नव्हतं. त्यामुळे हा खेळाडू नाराज होता. पण आता या खेळाडूला इंग्लंडमध्ये मोठी संधी मिळाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Mumbai Indians : आयपीएलच्या समाप्तीनंतर सर्व खेळाडू आपआपल्या घरी आणि मायदेशी परतले आहेत. यातील काही खेळाडू टेस्ट मालिकेसाठी इंग्लंडला रवाना झाले होते. तर काही खेळाडू भारतातच आहेत. अशात आता मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचं नशीब चमकलं आहे. मुंबईच्या या खेळाडूला टीम इंडियाच्या टेस्ट संघात स्थान मिळालं नव्हतं. त्यामुळे हा खेळाडू नाराज होता. पण आता या खेळाडूला इंग्लंडमध्ये मोठी संधी मिळाली आहे.
mumbai indians
mumbai indians
advertisement

हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून मुंबई इंडियन्सचा खेळाडू तिलक वर्मा आहे. तिलक वर्माने इंग्लंडच्या काउंटी चॅम्पियनशिपचा मार्ग स्विकारला होता.या दरम्यान तिलक वर्माने हॅम्पशायरशी करार केला आहे.हा करार आता पुर्ण झाला असून तिलक वर्मा आता हॅम्पशायर संघाकडून चार काऊंटी सामने खेळणार आहे.त्यामुळे मुंबईच्या खेळाडूला ही स्वत:ला सिद्ध करण्यासाठी चांगली संधी मिळाली आहे.

advertisement

दरम्यान हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला हे कळवताना आनंद होत आहे की तिलक वर्मा यांना हॅम्पशायर काउंटी संघाने ब्रिटनच्या काउंटी चॅम्पियनशिप लीगमध्ये खेळण्यासाठी संपर्क साधला आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशन त्यांना हॅम्पशायर काउंटीसोबतच्या अद्भुत सहकार्यासाठी शुभेच्छा देते, अशी माहिती हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने (एचसीए) दिली.

हैदराबाद येथील रहिवासी असलेल्या 22 वर्षीय तिलक वर्मा यांनी भारतासाठी 25 टी20 आणि 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये अनुक्रमे 749 आणि 68 धावा केल्या आहेत.तिलक वर्माने १८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 50.16 च्या सरासरीने 1 हजार 204 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर पाच शतके आणि चार अर्धशतके आहेत. त्याचा सर्वोच्च धावसंख्या 121 धावा आहे याशिवाय तिलक वर्माने 36 लिस्ट ए आणि 119 टी20 सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्ससाठी 54 सामन्यांमध्ये 1499 धावा केल्या आहेत.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचं नशीब चमकलं, इंग्लंड वरून आली गूडन्यूज, 'या' स्पर्धेत खेळणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल