TRENDING:

Pakistan Airstrike : विराटच्या दुश्मनाने 400 लोकांचा जीव घेणाऱ्या पाकिस्तानला झापलं! एका वाक्यात 'करेक्ट कार्यक्रम'

Last Updated:

Naveen Ul Haq Facebook post : इस्रायल आणि पाकिस्तानी राजवटीमध्ये कोणताही फरक शोधणे कठीण आहे, असं नवीन उल हक याने म्हटलं आहे. नवीनने एका वाक्यात पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम केलाय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Naveen Ul Haq Facebook post On Pakistan Airstrike : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील वाद आता आणखीच पेटल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघर्षाची सुरुवात 22 फेब्रुवारी रोजी झाली होती. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागांमध्ये हवाई हल्ले केले होते. अशातच पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हॉस्पिटलवर हल्ला केला असून त्यात 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतीये. अशातच आता पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसतीये.
Naveen Ul Haq Facebook post
Naveen Ul Haq Facebook post
advertisement

इस्रायल आणि पाकिस्तानी राजवटी सेमच - नवीन उल हक

पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर क्रिकेटर राशीद खान याने 'हा युद्ध गुन्हा' असल्याचं म्हटलं आहे. विशेषतः रमजानच्या पवित्र महिन्यात मानवी जीवनाची केलेली अवहेलना ही वेदनादायक आणि गंभीर चिंताजनक आहे, असंही राशीद यावेळी म्हणाला. अशातच आता विराटच्या कट्टर दुश्मनाने देखील यावर प्रतिक्रिया दिली असून पाकिस्तानला मोठी चपराक लगावली आहे. इस्रायल आणि पाकिस्तानी राजवटीमध्ये कोणताही फरक शोधणे कठीण आहे, असं नवीन उल हक याने म्हटलं आहे. नवीनने एका वाक्यात पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम केलाय.

advertisement

पाकिस्तानला चांगलंच झापलं

नवीन उल हक याने पाकिस्तानला चांगलंच झापलं. अफगाणिस्तानचे काही क्रिकेट घटनास्थळी गेले असून त्यांनी जखमींची भेट घेतली. तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे प्रवक्ते मोशर्रफ जैदी यांनी हे आरोप निराधार असल्याचं म्हटलं आणि काबुलमधील कोणत्याही रुग्णालयाला लक्ष्य केलं नसल्याचं सांगितलंय. पाकिस्तानने दारुलअमान, अरजान किंमत, खैरखाना आणि काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपास अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणले आहेत.

advertisement

Rashid Khan : 'रमजानच्या पवित्र महिन्यात जर...', पाकिस्तानच्या हल्ल्यात 400 जणांचा मृत्यू, राशीद खान भडकला! 'मी माझ्या देशासाठी...'

गुन्हेगारांना जबाबदार धरण्याचं आवाहन

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रेडलाईट एरियातलं ‘ते’ दृश्य पाहिलं, केरळच्या लीला ईसोंना ठरवलं, नागपुरात मोठं काम, Video
सर्व पहा

दरम्यान, मी संयुक्त राष्ट्र आणि इतर मानवाधिकार संस्थांना या नवीनतम अत्याचाराची सखोल चौकशी करण्याचे आणि गुन्हेगारांना जबाबदार धरण्याचं आवाहन करतो. या कठीण काळात मी माझ्या अफगाण लोकांसोबत उभा आहे. आपण बरं होऊ आणि एक राष्ट्र म्हणून आपण उठू. आपण नेहमीच असे करतो, असंही राशीद खान यावेळी म्हणाला आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Pakistan Airstrike : विराटच्या दुश्मनाने 400 लोकांचा जीव घेणाऱ्या पाकिस्तानला झापलं! एका वाक्यात 'करेक्ट कार्यक्रम'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल