वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार की नाही?
पीसीबीचे चेअरमन मोहसिन नकवी यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पाकिस्तान या वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार की नाही, याचा अंतिम निर्णय या शुक्रवारी किंवा आगामी सोमवारी घेतला जाण्याची शक्यता आहे. या संवेदनशील विषयावर चर्चा करण्यासाठी नकवी यांनी चक्क पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेतली असून, सरकारी पातळीवर यावर गांभीर्याने विचार विनिमय सुरू आहे.
advertisement
पाकिस्तानने माघार घेतली तर...
जर पाकिस्तानने पंतप्रधान यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर माघार घेतली तर पाकिस्तान स्वत:च्या जाळ्यात अडकेल. पाकिस्तानने बांगलादेशला सपोर्ट करण्यासाठी आवाज उठवला खरा पण याचा फायदा बांगलादेशला होऊ शकतो. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत आहेत. जर पाकिस्तानने माघार घेतली तर त्यांच्या जागी बांगलादेशला संधी देण्याचा प्रयत्न आयसीसी करेल. यामुळे बांगलादेशची अट देखील मान्य होईल आणि बीसीसीआय पाकिस्तानचा काटा देखील काढेल.
बांगलादेशला स्पर्धेत पुन्हा एन्ट्री
जर पाकिस्तानने या स्पर्धेतून माघार घेण्याचा टोकाचा निर्णय घेतला, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची दाट शक्यता आहे. मात्र, पाकिस्तान बाहेर पडल्यास बांगलादेश क्रिकेट टीमचे नशीब पालटू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या जागी बांगलादेशला स्पर्धेत पुन्हा एन्ट्री देण्याबाबत गांभीर्याने विचार केला जात असून, यामुळे स्पर्धेतील चुरस कायम राखता येईल.
सर्व मॅच श्रीलंका येथे खेळू शकेल
पाकिस्तान बाहेर पडल्यास बांगलादेशला ग्रुप A मध्ये स्थान दिले जाऊ शकते. विशेष म्हणजे, बांगलादेश आपली सर्व मॅच श्रीलंका येथे खेळू शकेल, अशी व्यवस्था आयसीसी करू शकते. हीच मागणी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) सुरुवातीला केली होती. अशा बदलामुळे लॉजिस्टिक स्तरावर फारशा अडचणी येणार नाहीत आणि स्पर्धेचे आयोजन सुरळीत पार पडू शकेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
