काय काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
पाकिस्तानविरुद्धची ही मॅच जिंकल्याचा खूप आनंद होतोय आणि भारतासाठी हा एक उत्तम 'रिटर्न गिफ्ट' आहे. मनात सतत विचार सुरू होता की, हा विजय भारताला 'रिटर्न गिफ्ट' म्हणून द्यायचा आहे. तुम्ही एखादी गोष्ट जिंकू इच्छिता आणि जेव्हा तुम्ही ती जिंकता, तेव्हा ती तुमच्यासाठी आधीच तयार असते. 'शेवटपर्यंत टिकून राहून बॅटिग करणं' ही एक गोष्ट मला नेहमीच करायची होती.
advertisement
मी नेहमीच स्पिनर्सचा चाहता - सूर्या
संपूर्ण टीमसाठी, आम्ही हा एक सामान्य सामना म्हणून पाहतो. आम्ही सर्व प्रतिस्पर्धकांसाठी सारखीच तयारी करतो. काही महिन्यांपूर्वी हीच गोष्ट घडली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमने (त्यांच्या स्पिन-हेवी अटॅकने) एक वेगळा टोन सेट केला होता. मी नेहमीच स्पिनर्सचा चाहता आहे, कारण ते मधल्या ओव्हर्समध्ये मॅच नियंत्रित करतात, असं सूर्या म्हणाला आणि अखेर त्याने मेन मुद्द्याला हात घातला.
पाकिस्तानवरचा विजय सशस्त्र दलांना समर्पित - सूर्यकुमार यादव
मला काहीतरी सांगायचं आहे. हा एक चांगला प्रसंग आहे. आम्ही पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहोत. आम्ही आमची एकजुटता व्यक्त करतो. हा विजय मी आमच्या सर्व सशस्त्र दलांना समर्पित करू इच्छितो, ज्यांनी खूप शौर्य दाखवलं. आशा आहे की ते आपल्याला सर्वांना प्रेरणा देत राहतील आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण त्यांना हसवण्यासाठी मैदानात अधिक कारणं देऊ, असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या..., काय म्हणाला सूर्या?
मला काही सांगायचं आहे आणि त्यासाठी हे ठिकाण अधिक योग्य आहे, पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबांसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत. हा विजय (पाकिस्तानविरुद्ध) आम्ही आपल्या शूरवीर सैन्यदलाला समर्पित करु इच्छितो, ज्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले. ते आम्हाला सतत प्रेरणा देत राहोत आणि आम्हालाही संधी मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवण्यासाठी आणखी कारण देता यावं, अशी आम्ही आशा करतो, असं म्हणत सूर्याने अखेरच्या बॉलवर सिक्स मारला.