मीरपूरमध्ये घडला ऐतिहासिक क्षण
बांगलादेशच्या मीरपूर येथील शेर-ए-बांग्ला स्टेडियमवर सचिनने आपल्या कारकिर्दीतील शतकांची शंभरी पूर्ण करत क्रिकेट इतिहासात अजरामर कामगिरी केली. त्या सामन्यात सचिन फॉर्ममध्ये परतण्याची धडपड करत होता आणि अखेर १४७ चेंडूंमध्ये ११४ धावा फटकावत त्याने शतक साजरे केले. या खेळीत त्याने १४ चौकार आणि १ षटकार मारला.
रोहितच्या Captaincyवर आली सर्वात मोठी अपडेट, निवड समिती घेणार महत्त्वाचा निर्णय
advertisement
100 शतकांचा विक्रम
सचिनची ही खेळी त्याच्या नेहमीच्या आक्रमक शैलीपेक्षा वेगळी होती. त्याने ७७.५५ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या, पण महत्त्वाचे म्हणजे, जगात आजवर कोणत्याही फलंदाजाने 100 शतकांचा विक्रम केला नव्हता. त्यामुळे क्रिकेटच्या इतिहासात सचिनचा हा विक्रम ऐतिहासिक असा ठरला.
निवृत्त झालो तरी तो एक सामना खेळण्यासाठी मैदानावर परत येईन; विराटचे मोठे वक्तव्य
भारताचा पराभव, पण...
सचिनच्या या ऐतिहासिक खेळीनंतर विराट कोहलीने ६६ आणि सुरेश रैनाने ५१ धावा जोडत भारताला ५० षटकांत ९ बाद २८९ धावांपर्यंत पोहोचवले. मात्र, बांगलादेशच्या फलंदाजांनी उत्कृष्ट खेळी करत चार चेंडू राखून सामना जिंकला. या पराभवामुळे भारतीय चाहत्यांना निराशा झाली, पण सचिनच्या विक्रमाने क्रिकेट जगतात इतिहास रचला.
ओपनिंग मॅच खेळणारे संघ फायनलच्या शर्यतीतून बाहेर? पहिलीच मॅच म्हणजे ‘मिनी फायनल'
सचिनने आपल्या २०० कसोटी सामन्यांमध्ये १५,९२१ धावा आणि ४६३ एकदिवसीय सामन्यांत १८,४२६ धावा केल्या आहेत. कसोटीत ५१ आणि वनडेमध्ये ४९ शतके ठोकत सचिनच्या नावावर 100 शतकांचा विक्रम आहे.
सचिन सध्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग २०२५ मध्ये खेळत आहे. या स्पर्धेत सचिन भारतीय संघाचे नेतृत्व करत असून आज रविवारी भारताची लढत वेस्ट इंडिज संघाविरुद्ध रायपुरच्या शहीद वीर नारायण सिंह मैदानावर होणार आहे.