जहीर अब्बास यांनी भारतीय महिला असलेल्या रीता लूथरा यांच्याशी लग्न करण्यासाठी त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. जहीर अब्बास आणि रीता लूथरा यांची भेट 1980 मध्ये झाली होती. जहीर त्यावेळी इंग्लंडमध्ये ग्लूस्टरशरसाठी खेळत होते तर रीता या डिजाइनिंगच शिक्षण घेत होत्या. काउंटी क्रिकेट दरम्यान जहीर आणि रीता या दोघांची भेट झाली. पहिल्याच भेटीत रीता जहीरला आवडली होती आणि त्याने मनोमन तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
advertisement
Sachin Tendulkar : ...जेव्हा सचिन 'तेंडुलकर'ला भेटतो, क्रिकेटचा देवही इमोशनल झाला, Video
रीता लूथराशी शी लग्न करण्यापूर्वी जहीर अब्बासचे आधीच एक लग्न झाले होते आणि पहिल्या पत्नीपासून त्यांला तीन मुली देखील होत्या. जहीर अब्बास यांचं पहिलं लग्न नसरीन नावाच्या महिलेसोबत झालं होत ज्यांच्यापासून त्यांना रुदाबा, रोशना आणि हिबा नावाच्या तीन मुली होत्या. रीताला आपली जोडीदार बनवण्यासाठी जहीर अब्बास यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. तर जहीर सोबत लग्न करण्यासाठी रीता लूथराने तिचा धर्म देखील बदलला. 1988 मध्ये रीता लूथरा आणि जहीर अब्बास यांनी लग्न केले.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर जहीर अब्बास आणि रीता लूथरा हे दोघे सध्या कराची येथे राहत असून ते समीना डिजाइनिंग हा कोट्यवधींचा बिझनेस चालवतात. दोघांना एक मुलगी देखील असून तिचे नाव सोनल आहे. जहीर अब्बासने पाकिस्तानसाठी एकूण 78 टेस्ट आणि 62 वनडे मॅच खेळले आहेत. यादरम्यान त्यांनी अनुक्रमे 5062 आणि 2572 धावा केल्या. जहीरने त्याच्या इंटरनॅशनल करिअरमध्ये एकूण 19 शतक ठोकली आहेत.
