Sachin Tendulkar : ...जेव्हा सचिन 'तेंडुलकर'ला भेटतो, क्रिकेटचा देवही इमोशनल झाला, Video
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
सचिन तेंडुलकरने त्याच्या सोशल मीडियावर आपल्या चाहत्याचा एक इमोशनल व्हिडीओ शेअर केला आहे.
मुंबई : भारताचा माजी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे जगभरात चाहते आहेत. सचिनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम रचून त्याचे नाव क्रिकेट जगतात अजरामर केले आहे. काही वर्षांपूर्वी सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आजही त्याच्या फॅन फॉलोईंग वाढतंच चालली आहे. असे असतानाच सचिन तेंडुलकरने त्याच्या सोशल मीडियावर आपल्या चाहत्याचा एक इमोशनल व्हिडीओ शेअर केला आहे.
माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून त्याला "सचिन मिट्स तेंडुलकर" असं कॅप्शन दिल आहे. शेअर केलेल्या व्हिडिओत सचिन गाडीतून जात असताना त्याला त्याचा एक चाहता भेटतो. या चाहत्याने तेंडुलकर नावाची जर्सी घातलेली आहे ज्यावर "मिस यू सचिन" असे लिहिले होते. हे पाहून सचिनने त्याच्या फॅनला भेटण्यासाठी गाडी रस्त्याच्या शेजारी थांबवली. सचिनला पाहून त्याच्या चाहता अवाक झाला आणि त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.
advertisement
सचिन तेंडुलकरने आपल्या चाहत्याची विचारपूस केली तसेच तो हेल्मेट घालून वाहतुकीचे सर्व नियम पाळत असल्याने त्याचे कौतुक देखील केले. चाहत्याने सचिनला त्याच्याकडे असलेल्या काही आठवणींचा संग्रह दाखवला जो पाहून सचिन भावूक झाला. चाहत्याने सचिनला भेटाच हात जोडले आणि नमस्कार केला.
advertisement
Sachin meets TENDULKAR.
It fills my heart with joy when I see so much love showered on me. It is the love from the people that keeps coming from unexpected corners which makes life so special. pic.twitter.com/jTaV3Rjrgm
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 1, 2024
advertisement
चाहत्यासोबतचा खास व्हिडीओ शेअर करून सचिन तेंडुलकरने लिहिले, " माझ्यावर प्रेमाचा वर्षाव होताना पाहून माझे हृदय आनंदाने भरून जाते.
अनपेक्षित कोपऱ्यांमधून सतत येणारे लोकांचे प्रेमच माझ्या आयुष्याला विशेष बनवते".
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2024 8:12 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sachin Tendulkar : ...जेव्हा सचिन 'तेंडुलकर'ला भेटतो, क्रिकेटचा देवही इमोशनल झाला, Video










