IND VS ENG : उद्यापासून दुसरी टेस्ट मॅच, इंग्लंडचा पराभव करण्यासाठी रोहित 'या' खेळाडूंना देणार प्लेईंग 11 मध्ये संधी

Last Updated:

टीम इंडिया दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला पराभूत करून सीरिज बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा इंग्लंडला टक्कर देण्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये महत्वाचे बदल होऊ शकतात.

टीम इंडिया
टीम इंडिया
मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जात आहे. या सिरीजमधील दुसरा सामना उद्या 2 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया त्यांच्या होम ग्राउंडवर इंग्लंडला पराभूत करून सीरिज बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा इंग्लंडला टक्कर देण्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये महत्वाचे बदल होऊ शकतात.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा टेस्ट सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाईएस राजशेखर क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. 25 जानेवारी रोजी टेस्ट सीरिजमधील पहिला सामना हैद्राबाद येथे खेळवण्यात आला होता. या सामन्यात इंग्लंडने 28 धावांनी विजय मिळवून भारताचा पराभव केला, त्यामुळे सध्या सिरीजमध्ये इंग्लंड 1-0 ने आघाडीवर आहे.
advertisement
दुसऱ्या टेस्ट सामन्यात रवींद्र जडेजा आणि केएल राहुल हे खेळताना दिसणार नाहीत. तर विराट कोहलीने पूर्वीच वैयक्तिक कारणांमुळे सुरुवातीच्या दोन सामन्यातून माघारी घेतली होती. त्यामुळे इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या टेस्ट सामन्यात प्लेईंग 11 मध्ये मोठे बदल होऊ शकतात. रवींद्र जडेजा आणि राहुल दुसऱ्या सामन्यात खेळणार नसल्याने त्यांच्या जागी वॉशिंग्टन सुंदर, सरफराज खान, रजत पाटीदार किंवा सौरभ कुमार यांच्यापैकी कोणा दोघांना संधी दिली जाऊ शकते.
advertisement
कुठे पाहता येणार सामना?
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमधील सर्व सामने हे जिओ सिनेमा आणि स्पोर्ट्स 18 वर पाहता येऊ शकतात. भारतीय वेळेनुसार सकाळी 9 : 30 वाजता सामना सुरु होणार असून त्यापूर्वी अर्धातास आधी टॉस करण्यात येईल.
टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11 : रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, केएस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND VS ENG : उद्यापासून दुसरी टेस्ट मॅच, इंग्लंडचा पराभव करण्यासाठी रोहित 'या' खेळाडूंना देणार प्लेईंग 11 मध्ये संधी
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement