पांढऱ्या रंगाची कार का सर्वात महाग असते? पाहा कोणत्या कलरची किती असते रिसेल व्हॅल्यू

Last Updated:

How Car Colors Affect Resale Prices: कार शोरुममधून बाहेर निघताच तुमच्या गाडीची किंमत का घटते तुम्हाला माहिती आहे का? पण गाडीचा रंग तिची किंमत घटण्यापासून रोशू शकतो? जाणून घेऊया 'पांढरा' रंग रिसेल मार्केटमध्ये सर्वाधीक आवडीचा का आहे?

कार रिसेल व्हॅल्यू
कार रिसेल व्हॅल्यू
नवी दिल्ली : आपण नवीन कार खरेदी करतो तेव्हा आपलं लक्ष हे फीचर्स, मायलेज आणि बजेटवर असतं. पण एक महत्त्वपूर्ण पैली आहे ज्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जातं. ते म्हणजे कारचा रंग. ऑटोमोबाईल एक्सपर्ट्स आणि रीसेल मार्केटच्या आकड्यांनुसार, पांढार रंग कारची मागणी आणि किंमत इतर रंगाच्या तुलनेत सर्वाधिक असते. चला समजून घेऊया 'कलर कोड'च्या मागील गणित काय आहे.
'यूनिव्हर्सल अपील' आणि मोठी मागणी
पांढरा रंग "सुरक्षित" आणि "क्लासिक" मानला जातो. तुमची जुनी कार विकताना, पांढरा रंग जवळजवळ प्रत्येकाला आवडतो. लाल किंवा चमकदार पिवळ्या कारसाठी तुम्हाला एक विशिष्ट खरेदीदार शोधावा लागेल, परंतु पांढऱ्या कारसाठी खरेदीदारांची लांब रांग असते. जास्त मागणी म्हणजे चांगले रीसेल व्हॅल्यू.
मेंटेनेंसमध्ये सोपी 
advertisement
पांढऱ्या रंगावर, धूळ, माती आणि हलके 'स्क्रॅच' इतर डार्क कलरच्या तुलनेत कमी दिसतात. डार्क रंगाच्या कारवर सामान्य स्क्रॅचही दुरुनच चमकतात. ज्यामुळे तिची कंडीशन खराब दिसले. म्हणूनच खरेदीदार किंमत कमी करण्याचा दबाव बनवतो.
उष्णतेचा परिणाम आणि केबिन आराम
भारतासारख्या उष्ण देशात, पांढरा रंग हा सर्वात व्यावहारिक रंग आहे. पांढरा रंग सूर्यप्रकाश रिफ्लेक्ट करतो, ज्यामुळे काळ्या किंवा गडद राखाडी कारपेक्षा केबिन कमी गरम होते. यामुळे प्रवाशांचा आराम तर वाढतोच पण एसीवरील भारही कमी होतो, ज्यामुळे दीर्घकाळात इंजिनचे आरोग्य सुधारते.
advertisement
पेंट मॅचिंग आणि रिपेयरिंगचा खर्च 
कारचा एकादा भाग अ‍ॅक्सीडेंटमध्ये डॅमेज झाला, तर पांढऱ्या रंगाला पुन्हा पेंट करणे सोपे आणि सर्वात स्वस्त असते. याच्या विरोधात मॅटेलिक पेंट किंवा 'पर्ल' फिनिश रंगांना मॅच करणे कठीण असते आणि त्याचा खर्चही जास्त येतो.
advertisement
कोणत्या रंगाची रिसेल व्हॅल्यू किती?
रँकरंगरिसेल व्हॅल्यू
1.व्हाइटबेस्ट व्हॅल्यू
2.सिल्व्हर ग्रेचांगली व्हॅल्यू
3.ब्लॅकप्रीमियम सेगमेंटमध्ये चांगली व्हॅल्यू
4.रेड/ब्लूकमी खरेदीदार
5.कस्टम कलरसर्वात कमी रिसेल व्हॅल्यू
advertisement
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
पांढऱ्या रंगाची कार का सर्वात महाग असते? पाहा कोणत्या कलरची किती असते रिसेल व्हॅल्यू
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement