नाडी सुरू पण हृदयाचे ठोके गायब? 70 वर्षांच्या आजीनं विज्ञानालाही चकवलं; नागपुरातील डॉक्टरांनी उलगडलं गुपित

Last Updated:

७० वर्षांच्या महिलेच्या हृदयाची डेक्स्रोकार्डिया स्थिती भारतातील पहिली घटना ठरली. डॉ. हितेंद्र भागवतकर यांच्या टीमने यशस्वी अँजिओप्लास्टी करून जीव वाचवला.

News18
News18
घरातलं काम करत असताना अचानक महिलेच्या छातीत दुखायला लागलं. श्वास घ्यायला त्रास झाला आणि काहीच सुचेनासं झालं. जीव जातोय की काय असं वाटू लागलं. महिलेची ही अवस्था पाहून तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टर तपासणी करतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती. तर रुग्णाच्या डाव्या बाजूला हृदयाचे ठोकेच ऐकू येत नव्हते! डॉक्टरांनी जवळजवळ आशा सोडली होती, पण तितक्यात नाडी तपासली तर ती सुरू होती. हृदय धडधडत नाहीये तर माणूस जिवंत कसा? या प्रश्नाने डॉक्टरही चक्रावून गेले. अखेर तपासणीअंती जे सत्य समोर आलं, त्याने वैद्यकीय विश्व हादरलं आहे.
७० वर्षी महिलेबाबतीत घडलेला हा प्रकार म्हणजे निसर्गाचा एक दुर्मीळ चमत्कार आहे. तातडीने केलेल्या तपासणीत डॉक्टरांच्या लक्षात आले की, या महिलेचे हृदय आपल्या सर्वांसारखे डाव्या बाजूला नसून चक्क उजव्या बाजूला आहे! वैद्यकीय भाषेत याला 'डेक्स्रोकार्डिया असे म्हणतात. वयाच्या ७० व्या वर्षी हे गुपित उघड होण्याची ही भारतातील पहिलीच तर जगातील तिसरी किंवा चौथी घटना असावी, असा दावा डॉक्टरांनी केला आहे.
advertisement
भारतातील पहिलीच घटना
वयाच्या ७० व्या वर्षी उजव्या बाजूला हृदय असल्याचे निदान झालेली ही जगातील तिसरी किंवा चौथी तर भारतातील पहिलीच घटना असल्याचा दावा डॉक्टरांनी केला. या महिलेच्या हृदयाची मुख्य रक्तवाहिनी ९० टक्के बंद झाली होती. हृदय उजव्या बाजूला असल्यामुळे ही शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती, मात्र तज्ज्ञांनी अत्यंत कौशल्याने अँजिओप्लास्टी केली आणि स्टेंट टाकून रक्तप्रवाह पूर्ववत केला.
advertisement
शस्त्रक्रियेसाठी एक तास लागला
ही शस्त्रक्रिया करण्याआधी रक्त पातळ करणारी औषधे, वेदनाशामक औषध द्यावी लागली. या शस्त्रक्रियेसाठी एक तासाचा वेळ गेला. हे करणं मोठं आव्हान होतं. तज्ज्ञांनी यशस्वी अँजिओप्लास्टी केली.डॉ. हितेंद्र भागवतकर यांच्या मते, आपल्या देशात अशा प्रगत वयातील रुग्ण आतापर्यंत आढळलेला नाही. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर या महिलेला नवे आयुष्य मिळाल्याची भावना त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
advertisement
काय आहे डेक्स्रोकार्डिया अवस्था?
वैद्यकीय भाषेत या दुर्मिळ स्थितीला डेक्स्रोकार्डिया असं म्हणतात. आईच्या पोटात बाळ असताना ही अवस्था तयार होते. साधारणतः ९ ते १८ आठवड्यांच्या कालावधीमध्ये ही अवस्था होते. जैविक बदल किंवा अनुवंशिक घटकांमुळे भ्रूणातील हृदयाची दिशा बदलते आणि ते उजव्या बाजूला विकसित होतं. अशा व्यक्तींची हाडे ठिसूळ असू शकतात आणि त्वचेचा रंग पांढरट असतो. ही स्थिती लाखो लोकांमध्ये एखादा रुग्णामध्ये आढळते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाडी सुरू पण हृदयाचे ठोके गायब? 70 वर्षांच्या आजीनं विज्ञानालाही चकवलं; नागपुरातील डॉक्टरांनी उलगडलं गुपित
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement