अखेर कृपा झालीच! २० जानेवारीपासून शनिचे नक्षत्र संक्रमण, या राशींचा गोल्डन टाइम सुरू होणार

Last Updated:

Astrology News : शनिदेवांचे नाव घेताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना कर्मफळदाता आणि न्यायदेवता मानले जाते.

Astrology News
Astrology News
मुंबई : शनिदेवांचे नाव घेताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना कर्मफळदाता आणि न्यायदेवता मानले जाते. व्यक्तीने केलेल्या कर्मानुसारच ते फळ देतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे शनीचा काळ म्हणजे संघर्ष, अडचणी आणि परीक्षा, असे समीकरण अनेकांच्या मनात पक्के झालेले असते. मात्र प्रत्येक वेळी शनी कठोरच असतात असे नाही. काही वेळा त्यांची कृपा लाभली, तर जीवनात स्थैर्य, समृद्धी आणि यशाची दारे उघडतात.
ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, 20 जानेवारी 2026 रोजी शनि ग्रह स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे, आणि हा नक्षत्र बदल काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. विशेष म्हणजे, शनी सध्या मीन राशीत असून संपूर्ण वर्षभर याच राशीत भ्रमण करणार आहे. मात्र या काळात शनी तीन वेळा आपले नक्षत्र बदलणार असून, त्यातील पहिला नक्षत्र बदल 20 जानेवारी रोजी घडणार आहे.
advertisement
शनीचा नक्षत्र बदल का महत्त्वाचा?
ज्योतिषशास्त्रानुसार, शनी जेव्हा राशी किंवा नक्षत्र बदलतो, तेव्हा त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडतो. नक्षत्र बदल म्हणजे ग्रहाची सूक्ष्म पातळीवरील हालचाल, ज्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या नशिबावर, कर्मावर आणि जीवनातील घटनांवर होतो. 20 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजून 13 मिनिटांनी शनी स्वतःच्या नक्षत्रात उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. हे नक्षत्र शनीचे असल्याने या काळात शनीची शक्ती अधिक प्रभावी मानली जाते.
advertisement
या तीन राशींवर होणार विशेष कृपा
शनीच्या या नक्षत्र भ्रमणामुळे तीन राशींच्या लोकांना विशेष लाभ होणार असल्याचे ज्योतिषतज्ज्ञ सांगतात. या राशींसाठी हा काळ आर्थिक प्रगती, करिअरमध्ये यश आणि मानसिक स्थैर्य घेऊन येणारा ठरू शकतो.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचा नक्षत्र बदल भाग्यवर्धक ठरणार आहे. अडकलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. नोकरीत असलेल्यांना पदोन्नती, जबाबदारी वाढ किंवा मान-सन्मान मिळू शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर पगारात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण राहील आणि बचत वाढेल. तसेच वडिलोपार्जित मालमत्तेपासून लाभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी शनीचे हे नक्षत्र भ्रमण अत्यंत लाभदायक ठरणार आहे. पैशाची चणचण दूर होईल आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. व्यवसाय करणाऱ्यांना मोठे करार मिळू शकतात. व्यवसायाचा विस्तार होण्याची आणि नफ्यात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. परदेशात नोकरी किंवा व्यवसायाची संधी मिळू शकते. अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. स्थावर मालमत्तेत गुंतवणूक केल्यास लाभ मिळण्याची शक्यता असून घर, जमीन यासंबंधी चांगली बातमी मिळू शकते.
advertisement
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी तर हा काळ विशेष शुभ मानला जात आहे, कारण शनी हा या राशीचा स्वामी ग्रह आहे. उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. दीर्घकाळ केलेल्या मेहनतीचे फळ मिळू लागेल. एखादा मोठा व्यावसायिक करार किंवा जबाबदारी मिळू शकते. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तसेच कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते, ज्यामुळे मनःशांती मिळेल.
advertisement
(सदर बातमी फक्त महितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही) 
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
अखेर कृपा झालीच! २० जानेवारीपासून शनिचे नक्षत्र संक्रमण, या राशींचा गोल्डन टाइम सुरू होणार
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement