Brain Stroke : ब्रेन स्ट्रोकने घेतला मराठी कला दिग्दर्शकाचा जीव; या सवयीमुळे तुम्हालाही धोका

Last Updated:
Nitin Borkar Death Due to Brain Stroke : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन बोरकर यांचा ज्या ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू झाला आहे, तो होण्यास आपल्या काही सवयीच कारणीभूत ठरत आहेत.
1/11
प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन बोरकर यांचा ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू झाला आहे.  काही महिन्यांपूर्वी नितीन बोरकर यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्यांना डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

advertisement
2/11
ब्रेन स्ट्रोक ही एक गंभीर समस्साय जो कधीकधी जीवनासाठी एक मोठा धोका बनतो. यामागे अनेक कारणे आहेत. पण सर्वात मोठा परिणाम आपल्या रोजच्या जगण्याच्या सवयींमुळे होतो.  आपल्या जीवनशैलीतील काही सवयी आपल्या नकळत अनेक प्रकरणांमध्ये ब्रेन स्ट्रोकला आमंत्रण देतात, असं दिल्लीतील न्यूरोसर्जन डॉ. गौरव बन्सल यांनी सांगितलं आहे. त्या सवयी कोणत्या ते पाहुयात.

3/11
स्मोकिंग : धूम्रपान हे ब्रेन स्ट्रोकच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. यामुळे रक्तवाहिन्या अरुंद आणि कडक होतात, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो.

4/11
मद्यपान : जे लोक जास्त दारू पितात, त्यांचा रक्तदाब लक्षणीय वाढतो. हृदयाचे ठोकेही अनियमित होतात. त्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे दारूचं व्यसन पूर्णपणे टाळा.

5/11
सॅच्युरेटेड, ट्रान्स फॅट, कोलेस्ट्रॉल, सोडियम युक्त आहार : यामुळे लठ्ठपणा, रक्तदाब वाढवतो. दोघांमुळेही स्ट्रोक होण्याची शक्यता असते. फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य समृद्ध संतुलित आहार हा धोका कमी करण्यास मदत करू शकतो.

6/11
तणाव : अति तणावामुळे उच्च रक्तदाब होतो, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यामुळे शक्य तितका मेंदू शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

7/11
झोपेची कमतरता : झोपेची कमतरता शरीराच्या सामान्य प्रक्रियेवर विपरित परिणाम करते. स्ट्रोकचा धोका वाढतो. निरोगी, प्रौढ व्यक्तीला दररोज 7-9 तासांची झोप आवश्यक असते.

8/11
औषधांकडे दुर्लक्ष करणं :  मधुमेह, उच्च रक्तदाब आणि ऍट्रियल फायब्रिलेशन यांसारखे रोग देखील स्ट्रोकसाठी जोखीम घटक आहेत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका आणि नियमित तपासणी करा. या आजारांवरील उपचारासाठी डॉक्टरांनी सांगितलेली औषधं न घेतल्यास पक्षाघाताचा धोका वाढतो.

9/11
हायड्रेटेड न राहणं : निर्जलीकरण म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता हा एक घटक आहे, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात. पुरेसे पाणी प्यायल्याने ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी होतो.

10/11
व्यायामाचा अभाव : व्यायाम किंवा शारीरिक हालचालींचा अभाव, बैठी जीवनशैली यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. नियमित शारीरिक हालचालींद्वारे निरोगी वजन राखलं जातं. हे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतं, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारून ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी करतं.

11/11
लठ्ठपणा : जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या परिस्थिती उद्भवू शकतात, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. योग्य आहार आणि व्यायामाद्वारे निरोगी वजन राखता येते.

Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement