'तुझ्या अफेअरबद्दल घरी सांगेन'; पुण्यातील तरुणीला धमकावून वारंवार अत्याचार, शेवटी तर गाठला कळस
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पीडित तरुणी एकदा तिच्या मित्रासोबत रिक्षातून जात असताना आरोपी नील निंबाळकर याने तिला पाहिले होते. यावरून त्याने तरुणीला धमकावण्यास सुरुवात केली
पुणे : पुणे शहरालगतच्या फुरसुंगी परिसरात एका १९ वर्षीय तरुणीला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी तातडीने कारवाई करत नील भरत निंबाळकर (वय १९, रा. फुरसुंगी) याला अटक केली आहे.
धमकावून अत्याचार आणि लूट: मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एकदा तिच्या मित्रासोबत रिक्षातून जात असताना आरोपी नील निंबाळकर याने तिला पाहिले होते. यावरून त्याने तरुणीला धमकावण्यास सुरुवात केली. "तुझे एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याची माहिती मी तुझ्या घरच्यांना देईन," अशी धमकी त्याने दिली. घरच्यांना कळण्याच्या भीतीने तरुणी हतबल झाली असता, आरोपीने या परिस्थितीचा गैरफायदा घेतला.
advertisement
आरोपीने तरुणीला वेळोवेळी धमकावून तिच्यावर बलात्कार केला. केवळ शारीरिक अत्याचारच नव्हे, तर बदनामीची भीती घालून त्याने तरुणीकडून सोन्याचे दागिने देखील बळजबरीने उकळले. आरोपीची मागणी आणि धमक्या दिवसेंदिवस वाढतच गेल्याने, अखेर या छळाला कंटाळून तरुणीने हिंमत एकवटली आणि फुरसुंगी पोलीस ठाणे गाठले.
advertisement
तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपी नील निंबाळकरला बेड्या ठोकल्या आहेत. एका तरुण मुलीच्या असहायतेचा फायदा घेऊन तिला ब्लॅकमेल करणाऱ्या या विकृत तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 1:28 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
'तुझ्या अफेअरबद्दल घरी सांगेन'; पुण्यातील तरुणीला धमकावून वारंवार अत्याचार, शेवटी तर गाठला कळस







