मध्यमवर्गीयांची नवी फॉर्च्युनर भारतात होणार लॉन्च! 'या' कंपनीने केली पूर्ण तयारी 

Last Updated:

JSW मोटर्स लिमिटेड जूनमध्ये जेटूर T2 प्लग-इन हायब्रिड SUV लॉन्च करणार आहे. जिची किंमत जवळपास 45 लाख असेल. याचा बेस व्हेरिएंट भारतात छत्रपती संभारीनगरात असेंबल होईल.

ऑटो न्यूज
ऑटो न्यूज
नवी दिल्ली : JSW ग्रुपची नवी पॅसेंजर कार कंपनी, JSW मोटर्स लिमिटेड, जूनमध्ये आपला पहिला मॉडल लॉन्च करेल. मनी कंट्रोलच्या एका ताज्या रिपोर्टवरुन ही माहिती समोर आलीआहे. हे मॉडल एक प्लग-ईन हायब्रिड SUV असेल. जिची किंमत जवळपास 45 लाख रुपये होण्याची अपेक्षा आहे ही पहिली JSW मॉडल चीनी कंपनी चेरीच्या जेटुर ब्रँडची D-सेगमेंट SUV T2 चा रेर्बिज्ड व्हर्जन असेल. ऑटोकोर इंडियाने आपल्या पुढील रिपोर्टमध्ये हे सांगितले. जेटुर T2 ची लांबी 4,785 मिमी, रुंदी 2,006 मिमी, उंची 1,875 मिमी आणि व्हीलबेस 2,800 मिमी आहे.
ऑफ-रोड एसयूव्ही
जेतूर T2 ही ऑफ-रोड एसयूव्ही म्हणून बाजारात आणली जाते आणि तिची रचनाही तशीच आहे. याचा अर्थ टोयोटा फॉर्च्युनरशी स्पर्धा करण्यासाठी जेएसडब्ल्यू भारतात ही नवीन व्हर्जन सादर करू शकते. T2 मध्ये 205 मिमी ग्राउंड क्लिअरन्स, 28-अंशाचा अप्रोच अँगल, 30-अंशाचा डिपार्चर अँगल आणि 700 मिमीची वॉटर वेडिंग डेप्थ आहे.
advertisement
जेटूर: T2 प्लग-इन हायब्रिड
चीनमध्ये, जेटूर T2 प्लग-इन हायब्रिड तीन व्हेरिएंटमध्ये विकली जाते. बेस व्हेरिएंटमध्ये 1.5-लिटर टर्बोचार्ज्ड चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे जे 115 kW (154 hp) आणि 220 Nm टॉर्क निर्माण करते. यात दोन मोटर्स देखील आहेत, ज्या एकत्रितपणे 165 kW (221 hp) पॉवर आणि 390 Nm टॉर्क निर्माण करतात. हे गुओटियन हाय-टेक द्वारे निर्मित 27.2 kWh LFP बॅटरी पॅकद्वारे समर्थित आहे, जे WLTC नुसार 100 किलोमीटरची शुद्ध इलेक्ट्रिक रेंज प्रदान करते.
advertisement
रेंज आणि परफॉर्मेंस 
मीडल व्हेरिएंटमध्ये तेच पॉवरट्रेन आहे. मात्र यामध्ये CATL द्वारे तयार केलेली 43.24 kWh LFP बॅटरी पॅक आहे. ज्यामुळे WLTC इलेक्ट्रिक रेंज 162 किलोमीटर किलोमीटर होते. टॉप व्हेरिएंटमधयेही तिच 1.5 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजि नाहे. मात्र यामध्ये तीन इलेक्ट्रिक मोटर्स आहेत. जे मिळून 340 किलोवॅट (456 एचपी) ची पॉवर आणि 700 एनएमचा टार्क देते. यामध्येही 43.24 kWh LFP बॅटरी पॅक आहे आणि WLTC नुसार हे EV मोड मध्ये 160 किलोमीटरपर्यंत चालू शकते.
advertisement
भारतात बेस व्हेरिएंट लाँच होणार
JSW भारतात फक्त बेस व्हेरिएंट देऊ शकते. कंपनी चीनमधील फुझोऊ (फुजियान प्रांत) येथील जेतूरच्या प्लांटमधून T2 प्लग-इन हायब्रिडचे नॉक-डाऊन किट आयात करेल आणि छत्रपती संभाजी नगर (महाराष्ट्र) येथील त्यांच्या कारखान्यात ते असेंबल करेल. जूनमध्ये लाँच झाल्यानंतर, कंपनी एप्रिलमध्ये SUV ची पहिली माहिती जाहीर करेल अशी अपेक्षा आहे.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
मध्यमवर्गीयांची नवी फॉर्च्युनर भारतात होणार लॉन्च! 'या' कंपनीने केली पूर्ण तयारी 
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement