KYC केलं तरी खात्यावर पैसे आलेच नाहीत, संतप्त लाडक्या बहिणींनी 2 तासांपासून रोखला महामार्ग
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
लाडकी बहीण योजनेत KYC त्रुटी, नाव गहाळ, लाभ न मिळाल्याने भंडारा व यवतमाळमध्ये महिलांचा संताप; यशोमती ठाकूर यांनी महायुती सरकारवर टीका केली.
लाडकी बहीण योजनेच्या E KYC साठी कोणतीही मुदतवाढ देण्यात आली नाहीत. 31 डिसेंबरनंतर कोणतीही मुदतवाढ मिळालेली नाही. त्यामुळे काही महिलांना KYC दरम्यान झालेल्या चुका सुधारण्याची संधीही मिळाली नाही. तर काही महिलांनी आपलं नावच गहाळ झाल्याची तक्रार केली आहे. लाखो महिलांच्या खात्यावर लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले नाहीत. काही लाडक्या बहिणींची नाव यादीतून गहाळ झाली आहेत. तर काहींच्या KYC मध्ये त्रुटी असल्याचं सांगितलं आहे.
संतापलेल्या लाडक्या बहिणींना आता भंडारा आणि यवतमाळमध्ये रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांना महामार्ग रोखून धरला आहे. नोव्हेंबर २०२५ पासून महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही. राज्यातील बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर पैसे आले नाहीत. कुठे नाव गहाळ झाले तर कुठे अपात्र ठरविण्यात आले आहे. केवायसी करूनही पैसे येत नसल्याने महिला संतप्त झाल्या.
advertisement
भंडारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत राष्ट्रीय महामार्ग जवळपास दीड तास महामार्ग रोखून धरला. तीन-चार दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनीही यवतमाळच्या जिल्हा महिला बालविकास कार्यालयावर धडक दिली होती.
भंडारा, यवतमाळ जिल्ह्यात नोव्हेंबर २०२५ पासून महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही. राज्यातील बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर पैसे आले नाहीत. कुठे नाव गहाळ झाले तर कुठे अपात्र ठरविण्यात आले आहे. केवायसी करूनही पैसे येत नसल्याने महिला संतप्त झाल्या.… pic.twitter.com/sdhyGAG9kP
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) January 19, 2026
advertisement
निवडणूक आली की, महायुती सरकारला लाडक्या बहिणी आठवतात. निवडणूक संपताच या लाडक्या बहिणींचा विसर पडतो. महायुती सरकारचे हे दुटप्पी धोरण भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी उघड केलं अशी टीका यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करून केली आहे. यशोमती ठाकूर यांचं ट्वीट सध्या तुफान चर्चेत आहे.
लाडकी_बहीण_योजना मध्ये KYC करताना प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारले असल्याने अनेक ग्रामीण महिलांनी चुकीचा ऑप्शन निवडला गेला. महिलांनी पुन्हा KYC केली नाही. तर त्यांचे पैसे आले नाहीत असेही अनेक लाडक्या बहिणींचे म्हणणे आहे. त्यामुळे आता यावर सरकार काय निर्णय घेतं ते पाहावं लागणार आहे. E KYC पुन्हा करण्यात यावी ही मागणी लाडक्या बहिणी जोर लावून धरत आहेत.
Location :
Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 12:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
KYC केलं तरी खात्यावर पैसे आलेच नाहीत, संतप्त लाडक्या बहिणींनी 2 तासांपासून रोखला महामार्ग








